Video: कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप; दगडांनी भरलेला डम्पर अन्…

Cockroach-Janta-Party
Share

नवी दिल्ली : जंतर मंतर परिसरात दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार आढळल्याने एकच खळबळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीकडून हा दिल्ली पोलिसांचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभिजित दिपके यांनी दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कारचा व्हिडिओ ट्विट करत दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल केला आहे.

कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) आज (सोमवार) संसदेवर मोर्चा काढला जाणार आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी यासाठी परवानगी दिलेली नाही. जंतर मंतरवर सुमारे 10 हजारांवर आंदोलक जमले आहेत. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके म्हणाले, “आमच्या बाजूने कोणीही काहीही चुकीचे करणार नाही. संसदेकडे जाणारा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असावा, जेणेकरून आंदोलनाला गालबोट लागणार नाही.”

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अभिजीत दीपके यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जंतर-मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आले आहेत. पोलिस प्रशासनाचा नक्की काय डाव आहे? शांततापूर्णरीत्या आंदोलन करणाऱ्या CJP कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याचा ते कट रचत आहेत का? अशी विचारणा केली आहे. दिल्ली पोलिसांची लाज वाटली पाहिजे. जंतर-मंतरवर आधीच दगड भरलेला एक ट्रक आणि एक नादुरुस्त व्हॅन आणून ठेवण्यात आली आहे. लवकरच ‘मीडिया’ अशा बातम्या चालवेल की, या शांततापूर्ण आंदोलनाची बदनामी करण्यासाठी आंदोलकांनीच ती व्हॅन तोडफोड करून खराब केली.

‘आमच्या बाजूने कोणीही काहीही चुकीचे करणार नाही. हे आंदोलन आणि संसदेकडे जाणारा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण राहील याची खात्री करणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही गेल्या महिनाभरापासून येथे बसलो आहोत. सोनम वांगचुक यांनी या आंदोलनासाठी आपला जीव धोक्यात घातला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनाला गालबोट लागू देणार नाही,’ असेबी अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 23 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी तीन अटी ठेवल्या आहेत. पहिली अट म्हणजे, शिक्षण व्यवस्था आणि पेपरफुटीची जबाबदारी सरकारने घ्यावी. दुसरी अट म्हणजे, सरन्यायाधीशांच्या शिष्टमंडळाला संसदेत जाण्याची परवानगी द्यावी आणि खासदारांनी हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन द्यावे. तिसरी अट म्हणजे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे हे शक्य नसल्यास, खासदारांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन हे आश्वासन द्यावे.

देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही…

धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

खळबळजनक दावा! पंतप्रधान मोदी अन् अभिजीत दीपके यांची गुप्त भेट…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *