मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सहा खासदार आता शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केला. नंतर या गटाने शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरण केले. आता या विलिनीकरणावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या सहाही खासदारांची खासदारकी वाचली असून ते आता शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार म्हणून काम करणार आहेत.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्या लोकांनी या खासदारांना निवडून दिलं आहे त्यांची कामं होणं महत्त्वाची आहेत. आमच्याकडे आलेल्या सहा खासदारांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना मोठा विकासनिधी दिला जाईल.”
दरम्यान, ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी दोन तृतीयांश 6 खासदार फुटल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या पक्षाचे लोकसभेतील कार्यालय काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. कारण नियमानुसार, एखाद्या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून किमान 5 खासदार असणे गरजेचे आहे. तरच त्यांना एक कार्यालय दिले जाऊ शकते. पण आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेमध्ये केवळ तीन खासदार उरले आहेत.
ऑपरेशन टायगर २ आणि 3 होणार; शिवसेना खासदाराच्या दाव्याने खळबळ…
भाजपने शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिला झटका…