पार्थ पवार जमिनीप्रकरणात अंजंली दमानिया करणार मोठा गौप्यस्फोट…

anjali-damania
Share

मुंबई : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आणखी खुलासे करणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर अजित पवार यांनी पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या, ‘माझी महसूल मंत्र्यांसोबत बैठक झाली, मला समितीसमोर सर्वकाही डिस्पोज करायचं आहे, आणि माहिती समितीच प्रमुख विकास खारगे यांना द्यायची आहे. हे सगळे लँड माफिया कसे घोटाळे करतात हे सांगायचं आहे. पुण्याहून आलेले गायकवाड कुटुंबातील पेपर मी बावनकुळे यांना दाखवले. 1932 सालची महार वतनाची सनद, सरकारकडे जमीन दिल्यावर त्यांनी पैसे स्विकारले नाहीत, याचे देखील पुरावे दिले आहेत. पत्रांची कॉपी देखील मी त्यांना दिली आहे, गायकवाड कुटुंबांचे एक हेअरींग घेत ती जमीन त्यांना द्यायची की नाही हे सरकार ठरवेल.’

सरकारने 42 कोटी रुपये देत व्यवहार रद्द करण्यासंदर्भाच नोटीस काढली, पण ती चुकीची आहे. महसूल विभागाकडे यासंदर्भात चौकशी नाही, हे सर्व कोर्टातून करावे लागेल, यातले काही पुरावे मी उद्या देणार, यात राजकारण आहे. अजित पवार यांची पत्रकार परिषद मी पाहिली, गेल्या 15-16 वर्षात काहीही सिद्ध झालं नाही असं ते म्हणाले. मात्र, सर्व सिद्ध झालं होतं, पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस असल्याने सर्व बाजूला टाकण्यात आलं. मी सगळे घोटाळे उघड करण्यासाठी आता कोर्टात जाणार आहे, असा इशाराही अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना दिला. बोगस कंपन्या बनवत जमिनीचे व्यवहार झाले आहेत. सिंचन घोटाळ्यात तुम्हाला फडणवीस यांनी बाहेर काढले आहे. मात्र, इतर घोटाळ्यात मग तुम्ही कुठेही जा, अमित शहांकडे जा किंवा कुठेही जा, आम्ही कोर्टात जाऊ आणि प्रकरणं तडीस नेऊ. आपलं ते बाबल्या आणि दुसऱ्यांचं ते कारटं. सुप्रिया सुळेंकडून मला अपेक्षा नव्हती, कुटुंबातील व्यक्ती आहे, मी बोलणार नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. मात्र, त्यांनीही याचं समर्थन केलं, असे म्हणत दमानिया यांनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली आहे.

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 2011 साली अपेक्षा ठेवली होती, ते सिंचन घोटाळ्यावर बोलत होते. अजित दादा चक्की पिसींग-पिसींग असे बोलले होते. मात्र, त्यांच्यासोबतच त्यांनी तीनदा शपथ घेतली, ह्या सर्वामुळे मला अतिशय दुःख झाले. अजित पवार आता फडणवीसांचे मित्र झाले आहेत. मला फडणवीस यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाहीत. धनंजय मुंडेंचे प्रकरण असो किंवा इतर गोष्टी यात सगळं हेच झालं. पालकमंत्र्याविरोधात कोणीही बोलू शकतो का? कारण तो पार्थ अजित पवार आहे, म्हणून गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणात दिग्विजय पाटील एक प्यादे आहे, अथॉरिटी लेटर देत त्याने सही केली होती. पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांचे काढून घेतले पाहिजे, त्यांच्याकडून स्वतः राजीनामा देणं अपेक्षित आहे, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्याच्या पत्रकार परिषदेत त्या नेमकं कोणता खुलासा करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पार्थ पवार प्रकरण! थोरल्याच्या प्रतापाने धाकट्यावर अन्याय…

आजोबा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरुद्ध पुकारला राजकीय एल्गार…

पुणे जमीन घोटाळा प्रकरणात ट्विस्ट, व्यवहार रद्दच होऊ शकत नाही…

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल…

मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण! अजित पवार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राजीनाम्याची मागणी…

पार्थ पवार अडचणीत! आणखी एक कारनामा समोर, गुन्हा दाखल…

जमीन गैरव्यवहार प्रकरण! अजित पवार यांनी काढला पार्थच्या डोक्यावरचा हात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *