ट्रम्प बोले, मोदी डोले अन् मोदी मेलोडी मेलोडी करतात: प्रणिती शिंदे

praniti-shinde
Share

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर देशात पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढ, पुरवठ्यावरुन विरोधकांनी आंदोलने सुरू केली आहेत. विरोधकांनी मोदी सरकावर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनीही थेट मोदींवर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या पॉलिसीमुळेच भारत युद्धात सहभागी नसतानाही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागत आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झाली आहे. शेतकरी संकटात सापडलेला आहे, आणि हे मेलोडी मेलोडी करतं बसलेत. आज सोयाबीन, तुरीला पीक विमा मिळतं नाही. पण, अदानींचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है, आंदोलन अभी बाकी है.. आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकावर टीका केली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

शेतकऱ्यांवर जे संकट आज आलं आहे ते मुद्दाम आणलं गेलं आहे. इराणकडून तेल घ्यायचं बंद केलं नसतं तर आज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले नसते. काही दिवसापूर्वी पंतप्रधान शेतकऱ्यांना सांगतात खतं वापरू नका, खरीपाचा हंगाम असताना शेतकऱ्यांना खतं वापरू नका म्हणतात. शेतकऱ्यांना कोणी अडचणीत टाकलं, देशाला कोणी अडचणीत टाकलं असेल तर ते पंतप्रधानानी अडचणीत टाकले आहे, असे प्रणिती शिंदे यांनी म्हटले.

युद्ध आपल्या देशात नाही, युद्ध दूर देशात आहे तरी देखील आपल्यावर का परिणाम झाला? इंदिरा गांधींच्या काळात आपण युद्धात सहभागी होतो तरी देखील देश स्टेबल राहिला. मात्र, मोदींच्या पॉलिसीमुळे आज भारत युद्धात नसताना ही आपल्या लोकांना सगळं भोगावं लागत आहे. मोदी हे ट्रम्प तात्यांना आहारी गेले आहेत, ट्रम्प बोले मोदी डोले. शेतकरी संकटात पडला आणि हे विमानात जाऊन मेलोडी मेलोडी करतं बसलेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

तुमची ‘मन की बात’ खूप झाली; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र; चुका तुमच्या अन् भुर्दंड…

धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…

पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *