मोठी बातमी! मंत्रालयातील कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला; चर्चांना उधाण…

mantralaya
Share

मुंबई: राज्याचे मुख्य सत्ताकेंद्र असलेल्या मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातून तब्बल ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

चोरीच्या घटनेनंतर आता मंत्रालयातील नियमांवरून एक नवीनच राजकीय आणि प्रशासकीय चर्चा रंगू लागली आहे. नियमांनुसार, मंत्रालयात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला आपल्यासोबत १० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणी दरम्यान तशा सूचना दिल्या जातात. पण, मंत्री संजय राठोड यांच्या शासकीय कार्यालयात तब्बल ८० हजार रुपयांची एवढी मोठी रोकड आली कुठून? आणि ती तिथे का ठेवण्यात आली होती? याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. ही रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात येताच कार्यालयात एकच धावपळ उडाली. रात्री उशिरापर्यंत कसून झाडाझडती घेण्यात आली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

मंत्रालयासारख्या व्हीआयपी (VIP) इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठे जाळे आणि चोख पोलीस बंदोबस्त असतानाही ही चोरी झाली आहे. मात्र, या चोरीच्या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. सध्या पोलिसांत अधिकृत गुन्हा दाखल न करता तपास सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मंत्रालयातील लाचखोर लिपिकाकडे आणखी सापडली रक्कम…

आमदाराच्या कार्यालयात भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत आढळली बंदूक…

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय; मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतींपर्यंत…

धोक्याचा इशारा! कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपके यांचा नवा Video व्हायरल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *