आमदाराच्या कार्यालयात भेटायला आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत आढळली बंदूक…

Share

छत्रपती संभाजीनगर: भाजप आमदार संजय केनेकर त्यांच्या कार्यालयात एक व्यक्ती शुक्रवारी रात्री भेटायला आली होती. संबंधित व्यक्तीच्या बॅगमध्ये बंदूक सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आमदार केनेकर यांच्या घातपाताचा हा प्रयत्न होता का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संजय केनेकर यांना रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी काही लोक त्यांच्या कार्यालयात आले होते. भेटीनंतर परत जाताना त्यापैकी एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच विसरली. काही वेळाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बॅग तपासली असता, त्यामध्ये एक बंदूक आढळून आली. आमदारांच्या कार्यालयात अशा प्रकारे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी संबंधित बॅग आणि बंदूक ताब्यात घेतली. या प्रकरणाबाबत माहिती देताना क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, “आमदार केनेकर यांच्या कार्यालयात सापडलेली ती बंदूक ही ‘एअरगन’ आहे.” पोलिसांनी तातडीने तपास करत ती बॅग कोणाची होती, याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे केनेकर यांच्यासोबत काही घातपात घडवण्याचा कट रचला होता का? ती व्यक्ती कोण होती? ती एअरगन घेऊन का फिरत होती? आणि ती विसरण्यामागे काही विशिष्ट हेतू होता का? या सर्व बाजूंचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

चर्चांना उधाण! देवेंद्र फडणवीस एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीत…

मंत्रालयातील लाचखोर लिपिकाकडे आणखी सापडली रक्कम…

अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *