Video: राहुल नार्वेकर हाणामारी कुठे झाली हे तुम्ही सांगताय की मी सांगू…

sanjay-raut
Share

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडिओ एक्स माध्यमावर शेअर केला आहे. व्हिडीओत दिसणारी हाणामारी कुठे झाली आणि का झाली? नार्वेकर तुम्ही सांगताय की मी सांगू? असे विचारले आहे. त्यांच्या व्हिडीओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेना पक्षामधील पक्षफुटीनंतर शिवसेना कुणाची, याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिला. तेव्हापासून शिवसेना पक्षाच्या खास करून संजय राऊत यांच्या निशाण्यावर नार्वेकर आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत नार्वेकर कुटुंब प्रतिस्पर्धी उमेदवाराला माघार घेण्यासाठी कसे अडचणीत आहेत, याविषयी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सनसनाटी दावे केले होते. नार्वेकर आणि राऊत यांच्यात कमालीचा संघर्ष आहे. असे असताना राऊत यांच्या हाताला नार्वेकरांच्या उपस्थित सुरू असलेल्या भांडणाचा व्हिडीओ लागला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून दोन गटात जागेचा वाद सुरू असल्याचे दिसते. आतमध्ये शिरू नकोस, असे तुला सांगितले होते ना… आमच्या घरी साखरपुडा होता. तेव्हाही आणि आत्ताही आम्ही घरात नसताना तू आलासच कसा? आम्ही घरात नसताना संधी शिरून आतमध्ये शिरता का तुम्ही? आमची एवढी जागा गेली तरी…. फॉरेस्टमधील जागा किती काढली तुम्ही… असे एक महिला आणि एक पुरूष राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारीत आहे. त्यावर भांडण करू नका, असे राहुल नार्वेकर दुसऱ्या गटाला सांगत आहेत. त्यावर भांडणाचा विषय नाही. आम्ही पद्धतशीर सांगतोय. आम्ही असताना काही केले असते तर वेगळी गोष्ट. आम्ही नसताना तुम्ही अशा गोष्टी करताच कशा… भांडणाचा विषयच नाही… चूक तुमचीच आहे… असे लोक राहुल नार्वेकर यांना म्हणत आहेत. दुसऱ्या गटातील लोक आक्रमक झालेले असताना राहुल नार्वेक यांनी काढता पाय घेतला.

विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? असा प्रश्न संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांना उद्देशून विचारला आहे.

चर्चांना उधाण! देवेंद्र फडणवीस एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीत…

अजित दादांना व्हॅलेंटाईन पत्र! दादा आय लव्ह यु. ‘खूप मिस करतोय दादा’…

भगतसिंह कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस, नीट धोतर नेसता येत नाही अन्…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *