राहुल गांधी यांनी फलटणमधील डॉक्टर युवतीच्या कुटुंबीयांशी फोनवरून साधला संवाद…

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली: सातारा जिल्ह्यातील फलटण मधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी आज तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आहे.

डॉक्टर युवतीने हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे लिहिले आणि आत्महत्या केली आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. युवतीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. दोन दिवसांपूर्वी फलटणच्या डॉक्टर युवतीचा आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस नेते व लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांनी आज तरुणीच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आहे .

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली. या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील कुटुंबासमवेत फोनवरून संवाद साधला. यावेळी कुटुंब मराठीत बोलत होते. राहुल गांधी हे सर्व ऐकून घेत होते. ‘तुम्हाला आता काय हवंय ?’ असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी ‘SIT चौकशी आणि आरोपींना फाशी’ या दोन्ही गोष्टीची मागणी केली. यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *