मुंबई : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राज्यापल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे.
नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी (ता. १६) सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र, त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभाग ही खाती अजित पवारांकडे सोपवली गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर राज्यपालांकडूनही त्यास मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.