बारामती : पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र, एक परिवार म्हणून मी सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांना पाहतो. त्यांना उपमुख्यमंत्रीपद आणि अजितदादांकडील सगळी खाती मिळावीत, ही आमची इच्छा होती. आता सुनेत्रा काकीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या पाहिजेत, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले. ते बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजितदादांची मनापासूनची इच्छा होती की, पवार कुटुंबातील सर्वजण परिवार म्हणून सगळे एकत्र आले पाहिजेत. त्यासाठी दादांकडून प्रयत्न केला जात होता. सुप्रिया ताई, पवार साहेब आम्हीही असाच प्रयत्न करत होतो. दु:खद घटना घडल्यावर 13 दिवस आम्ही परिवार म्हणून एकत्र आहोत. अजितदादांचं स्वप्नं होतं की, परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे. त्यानुसार कुठेही न ठरवत आज काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार एकत्र मतदानला पोहोचले, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
पवार साहेबांनी काल जय पवार आणि आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले. ते मार्गदर्शन भावनिक स्वरुपाचे होते. काही गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात कराव्या लागतील, दादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी करायच्या आहेत, त्याबाबत काल संध्याकाळी चर्चा झाली. एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनात आली की, ते बोलावून घेतात आणि मार्गदर्शन करतात, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
मी 10 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत असणाऱ्या काही शंका उपस्थित करणार आहे. तर 12 तारखेला मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरलं होतं, हे सांगणार आहे. आम्ही विलीनीकरण का करणार होतो, दादांच्या आणि आमच्या मनात नेमकं काय होतं, हे मी सांगणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे आम्हाला कोणालाही काही सूचत नव्हते. त्यामुळे आमच्या मनात कोणतेही राजकीय विचार आले नव्हते. आता या धक्क्यातून बाहेर पडून आम्ही राजकीय विचार करायला सुरुवात करु. पवार कुटुंबीयांमध्ये आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. 9 तारखेनंतर या सगळ्याला सुरुवात होईल, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी विलिनीकरणावर नीलेश लंके यांचा मोठा दावा; अजित पवार गटातीलच कुणीतरी असुरक्षित होत
अजित पवार यांच्या निधनानंतर संस्थात्मक पदांची पवार कुटुंबात वाटणी; बारामतीत महत्त्वाची बैठक
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…
अजित पवार यांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल, म्हणाला…