अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांना चौकशीला कधी बोलवणार…

rupali-chakankar
Share

मुंबई : भोंदूबाबा अशोक खरातवर महिला अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. खरातच्या दरबारात हजेरी लावणे, त्याच्यावर छत्र धरणे, त्याचे पाद्यपूजन करणे, अशी कामे करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद गमवावे लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले. रुपाली चाकणकरांची अद्याप चौकशी का झाली नाही? असा सवाल वारंवार विरोधकांकडून उपस्थित केला जातो. अखेर आज एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकरांचे नाव न घेता उत्तर दिले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; अनुभव व लेख पाठविण्याचे आवाहन…

अशोक खरातबरोबरची जवळीक दोन महत्वाची पदे गेली आहेत. खरात प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास केला जात आहे. खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानशी संबंधित सर्व आजी-माजी सदस्यांची आता चौकशी होणार असल्याचे पुढे येत आहे. रुपाली चाकणकर या श्री शिवनिका संस्थानच्या कार्यकारिणीत सदस्या होत्या. त्यामुळे आपसूकच इतर सदस्यांप्रमाणे त्यांचीही विशेष तपास पथकाकडून कडून चौकशी होऊ शकते. मात्र ही चौकशी कधी होणार असा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता. अखेर आजच्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाता कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.

तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘एसआयटीने काहींना तपासासाठी का बोलावले नाही असा सवाल वारंवार विचारल जात आहे. मात्र आपल्याकडे तपासादरम्यान पुरावे जे समोर येतात त्यानुसार संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते. आपल्याकडे फिर्याद आणि साक्षीदार यांच्या माहितीनुसार कारवाई होते मुख्य आरोपी सोडून कोणी मदत केली आहे का? त्याचा तपास करत आहोत. याबाबात पुरावे समोर आले तर चौकशी केली जाणारच आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.’

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकर यांची बहिण अन्…

अशोक खरात प्रकरणात चौकशीसाठी बोलवताच रुपाली चाकणकर म्हणाल्या…

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना समन्स; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *