वादग्रस्त वक्तव्य! मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते…

bjp-nishikant-dubey
Share

नवी दिल्ली: संसदेत ‘अँटी पेपर लीक’ म्हणजेच लोक परीक्षा (अनुचित साधन निवारण) दुरुस्ती विधेयक २०२६ वर चर्चा सुरू असतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा गदारोळ झाला. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत अत्यंत वादग्रस्त टिप्पणी केली. आपल्या पुस्तकाचा संदर्भ देत निशिकांत दुबे म्हणाले, “मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते.”

अध्यक्षांच्या (स्पीकर) कडे पाहत दुबे म्हणाले, “सर, मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी पुस्तकातून हे प्रमाणित करून देतो की नेहरू रंगेल होते, तर होतेच.” या विधानानंतर संसदेत काही काळ जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर अध्यक्षांच्या मध्यस्थीने वातावरण शांत झाले. दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रियंका गांधी यांच्याकडून माफीची मागणी लावून धरली. प्रियंका गांधी यांचे विधान हे नव्या शिक्षणमंत्र्यांचे चारित्र्यहनन करणारे असल्याचे सांगत त्यांनी ती टिप्पणी कामकाजाच्या रेकॉर्डमधून हटवण्याची मागणी केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी मंगळवारी (ता. २८) लोकसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हणाल्या की, “पंतप्रधानांनी आपले सल्लागार बदलले पाहिजेत. जर सरकारला ‘जेन झेड’ (Gen Z – युवा पिढी) चा विश्वास पुन्हा जिंकायचा असेल, तर पंतप्रधानांना केवळ ‘कॅमेऱ्याचा अँगल’ नाही, तर ‘मनाचा अँगल’ देखील बदलावा लागेल दिल्लीत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणाच्या सांगण्यावरून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज करण्यात आला आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला? याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी दिले पाहिजे. आमचे विद्यार्थी काय दहशतवादी आहेत का? शातील जनता सरकारकडे उत्तर मागतेय, पण त्यांना उत्तर मिळत नाही,’असेही प्रियंका म्हणाल्या.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘देश खासदारांची जहागीर नसून जनतेची अमानत आहे” आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आज देशातील तरुणांना कष्टांपेक्षा बेईमानीला जास्त महत्त्व दिले जात आहे असे वाटू लागले आहे. शिक्षण व्यवस्थेत गंभीर त्रुटी असून मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत, तर कुटुंबे कर्ज काढून मुलांना शिकवत आहेत.’

‘कॉकरोच’च्या यशानंतर ई 20 जनता पार्टी स्थापन, निशाणा नितीन गडकरी यांच्यावर…

निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी; शिवसेना ही शिवसेनाच…

CJP आंदोलकांचा मोठा विजय! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *