‘कॉकरोच’च्या यशानंतर ई 20 जनता पार्टी स्थापन, निशाणा नितीन गडकरी यांच्यावर…

e20jp
Share

नवी दिल्ली : ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात ‘कॉकरोच जनता पार्टीने’ (CJP) जंतर-मंतरवर केलेल्या ऐतिहासिक आंदोलनानंतर आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर देशातील तरुणाईचा राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. CJP च्या या अभूतपूर्व यशावरून प्रेरणा घेत आता ‘E20 जनता पार्टी’ (E20JP) नावाच्या पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याच्या (E20 Petrol) केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करत, वाहनधारकांना 100 टक्के शुद्ध पेट्रोल खरेदी करण्याचा कायदेशीर पर्याय उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात येणार आहे.

E20 जनता पार्टीच्या सोशल मीडिया पेजची स्थापना झाल्यानंतर, इन्स्टाग्रामवर काहीच वेळात याचे फॉलोअर्सची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी प्रमाणे E20 जनता पार्टीलाही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. ‘E20 जनता पार्टी’च्या संस्थापकांनी आणि आंदोलकांनी आरोप केला आहे की, सरकारच्या 20 टक्के इथेनॉल मिश्रणामुळे जुन्या आणि नवीन वाहनांच्या इंजिनचे मोठे नुकसान होत आहे. वाहनांची मायलेज क्षमता कमालीची घटली असून, इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांना समान किंवा अधिक किंमत मोजूनही कमी दर्जाचे इंधन दिले जात असल्याचा दावा या पक्षाकडून करण्यात येत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

पक्षाच्या मुख्य मागण्या
1. 100 % शुद्ध पेट्रोलचा पर्याय : पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20 ऐवजी 100 टक्के शुद्ध पेट्रोल (Unblended Petrol) निवडण्याचा स्पष्ट आणि कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा.
2. किमतीत सवलत : जर सरकार इथेनॉल मिश्रित इंधन (E20) विकत असेल, तर त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने ग्राहकांना ते स्वस्त दरात मिळाले पाहिजे.
3. पारदर्शक लेबलिंग : प्रत्येक इंधन पंपावर कोणत्या नोझलमध्ये किती टक्के इथेनॉल आहे, याचे स्पष्ट फलक लावले जावेत.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात तरुण आणि विद्यार्थ्यांच्या ‘कॉकरोच जनता पार्टीने’ सरकारला नमवून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या होत्या. त्याच धर्तीवर आता E20 जनता पार्टीनेही जंतर-मंतरच्या आसपास आपले आंदोलन तीव्र केले आहे. देशातील करोडो वाहनधारकांच्या आणि मध्यमवर्गीय नागरिकांच्या खिशावर पडणारा हा थेट दरोडा असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा या नव्या पक्षाने दिला आहे.

…आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे

CJP आंदोलकांचा मोठा विजय! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *