सेना-भाजप वाद विकोपाला! शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा…

shahajibapu-patil
Share

सोलापूर : नगरपालिका निवडणुकीमुळे सध्या शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील वाद ठिकठिकाणी टोकाला जाताना दिसत आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकाने छापा टाकला आहे. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेतल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते मात्र संतप्त झाले आहेत.

सांगोल्यात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या युतीने शहाजी बापूंना एकटे टाकले आहे. यातूनच अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शहाजीबापूंनी सांगोल्यातून मोठी आघाडी घेण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी (ता. ३०) दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा झाली होती. या सभेत फडणवीस यांनी बापूंवर कोणतीही टीका केली नसली तरी शेकाप बरोबर झालेल्या युतीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

शहाजीबापू पाटील यांनी यालाच उत्तर देण्यासाठी सांगोल्यात विराट सभा घेतली. ही सभा संपताच शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. याच पद्धतीने बापूंच्या जवळ असणाऱ्या इतरही काही ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्यात नेमकी काय सापडले? याबाबत अजून काहीही माहिती समजली नसली तरी राज्यात सत्ता असताना अशा पद्धतीने मित्र पक्षाच्या नेत्यावर टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *