पुणे: राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्याला विनोदी इशारा दिल्याचे पाहायला मिळाले.
राजगुरुनगर येथील सभेत एका कार्यकर्त्याने भाषणादरम्यान अजित पवार यांचा उल्लेख राज्याचे मुख्यमंत्री असा केला. यामुळे क्षणभर वातावरणात हलकीशी खसखस पिकली. कार्यकर्त्याने अजित पवार यांना “राज्याचे मुख्यमंत्री” म्हणताच “मला उपमुख्यमंत्री म्हणा, मुख्यमंत्री नाही.” असा विनोदी इशारा अजित पवार यांनी कार्यकर्त्याला दिला.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
अजित पवार म्हणाले, माणुसकी म्हणून जगत असताना जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा. हुतात्मा राजगुरू यांचं बलिदान भारतातील कोणीच विसरु शकत नाही. या विचारांवर आपण पुढं जातोय. मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले. किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात.’
आचारसंहिता असल्यानं मला स्पष्टपणे बोलता येणार नाही. तुम्ही माझं ऐकलं तर मी तुमचं ऐकेन. परत म्हणाल मी दम दिला. म्हणून तुम्ही माझी विनंती ऐकली तर मी तुमची विनंती ऐकेन, असेही अजित पवार म्हणाले.
पक्ष तुझ्या काकाचा झालाय का? अजित पवारांच्या टीकेला कडक उत्तर…
अजित पवार भरसभेत संतापले, थेट हातात माईक घेतला अन् म्हणाले…
मोठी बातमी! पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार म्हणाले…