संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न : रुपाली चाकणकर

rupali-chakankar
Share

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आशा मिरगे यांना नोटीस पाठवली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात मिरगे यांनी चाकणकरांवर काही आरोप केले होते. मिरगेंनी असभ्य भाषेचा वापर करत काही विधान केली होती असा आरोप आता चाकणकरांनी केला आहे. आशा मिरगे यांनी केलेल्या आरोप बिनबुढाचे असून त्याविरोधात आता रुपाली चाकणकारांनी भूमिका मांडली आहे. आता लढाई कायद्याच्या चौकटतीच राहून आपण लढणार असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

अशोक खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम होती. खराताच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी माझा दुरान्वये संबंध नव्हता. गेले काही दिवस माझ्यावर अतिशय अश्लील विधानं करत कोणताही पुरावा नसताना माझ्यावर, माझ्या कुटुंबावर केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते. त्यामुळे मी आता कायदाच्या चौकटीत राहून लढाई लढणार आहे. दरम्यान मिरगेंना 4 एप्रिलला पहिली नोटीस पाठवली होती, मात्र त्यांनी नोटीस स्वीकारली नाही त्यामुळे आता माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागल्याचं चाकणकर यांनी म्हटले आहे. यावेळी बोलतांना भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांशी माझा काहीही संबंध नव्हता असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेश अध्यक्षपदाच्या या दोन्ही पदांचा राजीनामा दिलास, तरीसुद्ध चिखलफेक झाली. आशा मिरगे यांनी एका मुलाखतीदरम्यान अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगे यांना पाठवली होती. कायद्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून दोनदा ही नोटीस परत घरी पाठवली. एकूण तीन वेळा नोटीस पाठवली गेली पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही. अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. आशा मिरगेंना 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

माझा हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा असून इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत, यासाठी हा लढा आहे. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला. आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे. पहिल्या दिवसापासून सांगत आहे कोणताही पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य, गैरकृत्य कधीही केलेलं नाही. आमच्या कुटुंबाने खरातला केवळ आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं, याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती. म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढतीये. 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हजर राहा… मी देखील स्वतः माझगाव कोर्टात असेल, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

रुपाली चाकणकर यांची 6 तास ईडी चौकशी, गुवाटही दौऱ्याबाबत म्हणाल्या…

रुपाली चाकणकर यांचा पाय खोलात; खरातसोबत गुवाहाटी दौरा…

अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *