मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? : राहुल गांधी

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) अनुदानित एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा नऊवरून चारवर आणली आहे. यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली.

12 वर्षांच्या गरीब-विरोधी आर्थिक धोरणांमुळे आणि तडजोडीच्या परराष्ट्र धोरणामुळे देश अशा परिस्थितीत येऊन पोहोचला आहे, जिथे लाखो गरीब कुटुंबे आणि महिलांना विषारी लाकडाचा धूर श्वासावाटे आत घेण्यास भाग पडत आहे. अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच मोदींच्या लुटीचे मॉडेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

राहुल गांधी म्हणाले, उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित सिलेंडरची संख्या नऊवरून चारवर आणली आहे. इतकेच नाही, तर गेल्या तीन महिन्यांत घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ केली आहे. याचा अर्थ, आधी किंमत वाढवा, मग अनुदान कमी करा आणि गरिबांच्या चुली विझवा. स्थलांतरित मजुरांची जीवनरेखा असलेल्या 5 किलोच्या सिलेंडरच्या दरात 323 रुपयांची वाढ केली आहे. ते काय कमावणार, काय खाणार आणि काय वाचवणार?

अब्जाधीश मित्रांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करणे आणि स्वतःच्या अपयशाचे बिल गरिबांच्या माथी मारणे हे मोदींचे लुटीचे मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? तुम्ही निर्माण केलेल्या या ढासळत्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्ग चुकवणार का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी

राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *