ZP, पंचायत समिती उमेदवारांना खर्च मर्यादा किती? घ्या जाणून…

political-leader
Share

मुंबई: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा केली आहे.

५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार असून ७ फेब्रुवारीला निकालाचे चित्र स्पष्ट होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या राजकीय पक्षांमध्ये आणि इच्छुकांममध्ये या घोषणेमुळे मोठी लगबग सुरू झाली आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

निवडणूक आयोगाने यावेळेस उमेदवारांसाठी खर्चाची नवी मर्यादा देखील निश्चित केली असून ती जिल्हा परिषदेच्या जागांच्या संख्येनुसार विभागण्यात आली आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये ७१ ते ७५ निवडणूक विभाग आहेत, तिथे जिल्हा परिषद उमेदवाराला ९ लाख रुपये आणि पंचायत समिती उमेदवाराला ६ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. ६१ ते ७० विभाग असलेल्या जिल्ह्यांत ही मर्यादा अनुक्रमे ७.५० लाख आणि ५.२५ लाख रुपये असेल, तर ५० ते ६० विभाग असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी ६ लाख आणि पंचायत समितीसाठी ४.५० लाख रुपयांची मर्यादा आखून देण्यात आली आहे.

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांना दोन गोष्टींचा ठरतोय अडसर; पाहा मुहूर्त कधी…

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवा नियम, उमेदवारांचं वाढलं टेन्शन…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *