पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे मतदान उद्या (गुरुवार) पार पडणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर करत भाजपवर हल्लाबोल करत बॉम्ब टाकला आहे.
रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत आहे. खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. तर प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो आणि या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे. संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, भाजपचे आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील शाब्दिक युध्द चर्चेत आले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपने पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये काही गुन्हेगारांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली, त्यामुळे हा विषय जोरदार चर्चेत आला आहे.
चर्चांना उधाण! अजित पवार यांना गुन्हेगार उमेदवारांबद्दल विचारले अन् विषयच संपवला…
मला थोडे दिवस द्या सगळ्यांची औकात काढतो: रवींद्र धंगेकर
पुण्यात 165 जागांवर कशी होणार लढत; पाहा सर्वपक्षीय उमेदवारांची संपूर्ण यादी…