कंगना रनौतची जेन-झींबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य…

kangana-ranaut
Share

नवी दिल्ली: जेन-झींवर (Gen-Z) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खासदार कंगना रनौत सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. जेन-झींना ‘जनरेशन गटार’ म्हणून संबोधलं आणि सर्वत्र खळबळ माजली. अभिनयातून राजकारणात गेलेल्या कंगनानं जेन-झींबद्दल इतरही अनेक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य केली आहेत.

अभिनेत्री कंगना हिने हिंदू तरुणींवरही गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज-दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत टीका केली. यावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) प्रवक्ते सौरव दास यांनी कंगनावर टीकास्त्र डागले. पण, आता कंगनानं सौरव दास यांच्यावर प्रत्युत्तर दिले. कंगनानं सौरव यांच्या पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत त्यांना ‘निरुपयोगी आणि बेरोजगार’ म्हटले आहे. तसेच, याच्या वयात असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले, असेही म्हटले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

कंगना रनौतनं ANI सोबतच्या सौरव दास यांच्या मुलाखतीची एक व्हिडीओ क्लिप आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. तिनं त्यांच्या विद्यार्थी असण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या स्वतःच्या कामगिरीची तुलना सौरव दास यांच्या कारकिर्दीतील टप्प्यांशी करत, तिनं त्यांना ‘निरुपयोगी’, ‘बेरोजगार’ ठरवलं आहे. कंगनानं सौरव दास यांच्या वक्तव्याचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत लिहिलंय की, “मी या व्यक्तीला गूगलवर शोधलं, याचं वय 28 वर्ष आहे. तो स्वतःला विद्यार्थी कसा काय म्हणवतो? हे मला समजत नाही, मी गेल्या 2 वर्षांपासून राजकारणात असले, तरी 20 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे. त्याच्या वयात माझ्याकडे 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होते…”

कंगना रनौत पुढे बोलताना म्हणाली की, “नवीन खासदार म्हणून माझ्यावर कामाचा ताण होता, कारण मी केवळ खासदार नाही, तर चित्रपट निर्माती, अभिनेत्री, स्क्रीनरायटर आणि उद्योजिका देखील आहे. पण त्याच्यासारख्या पूर्णपणे बेरोजगार व्यक्तीला इतकं काम करणं म्हणजे, काय असतं हे कधीच कळणार नाही…”

“प्रिय सौरव, तुझे प्रश्न वैयक्तिक आहेत. तू विद्यार्थी नाहीस, तू निव्वळ एक बेरोजगार, निरुपयोगी जीव आहेस. काहीतरी नवीन कौशल्य शिकण्यापासून सुरुवात कर, ती एक चांगली सुरुवात ठरेल…”, असा सल्ला कंगना रनौतनं आपल्या पोस्टच्या शेवटी CJP प्रवक्ते सौरव दास यांना दिला आहे.

वादग्रस्त वक्तव्य! मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते…

‘कॉकरोच’च्या यशानंतर ई 20 जनता पार्टी स्थापन, निशाणा नितीन गडकरी यांच्यावर…

निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी; शिवसेना ही शिवसेनाच…

CJP आंदोलकांचा मोठा विजय! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *