नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी पेट्रोलच्या (Petrol Price) दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच 20 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. त्यावेळी पेट्रोलच्या दरात 86 पैसे आणि डिझेलच्या दरात 83 पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज (शनिवार) सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे.
पेट्रोल प्रतिलीटर दर 87 पैसे आणि डिझेल प्रतिलीटर किंमत 91 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.45 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा प्रतिलीटर दर 95.02 रुपयांवर पोहोचला आहे. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही तफावत आहे. इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. अवघ्या आठ ते नऊ दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवत आहे. बुलढाणा, जळगाव आणि वाशिममध्ये पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या आहेत.
राज्यातील शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर पुढीलप्रमाणे…
मुंबई
पेट्रोल- 108.45
डिझेल-95.02
परभणी
पेट्रोल- 110.45 पैसे
डिझेल- 97.02
कोल्हापूर
पेट्रोल- 109.30
डिझेल- 95.89
भंडारा
109.60 (पेट्रोल नवा दर)
96.18 (डिझेल नवा दर)
सोलापूर
पेट्रोल- 109.14
डिझेल- 95.74
अमरावती
पेट्रोल- 109.15
डिझेल- 95.68
वाशिम
पेट्रोल- 109.79
डिझेल- 96.39
नाशिक
पेट्रोल- 109.71
डिझेल- 96.26
नागपूर
पेट्रोल- 108.97
डिझेल- 95.58
रत्नागिरी
पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.01
अहिल्यानगर
पेट्रोल – 108.87
डिझेल – 95.47
पुणे
Petrol – 108.76
Diesal – 94.40
अकोला
पेट्रोल – 109.05
डिझेल – 95.63
बीड
पेट्रोल – 110.38
डिझेल – 96.92
छत्रपती संभाजीनगर
पेट्रोल – 110.44
डिझेल – 97.10
पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….
पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी