मुंबईः पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी तर डिझेलच्या दर 94 पैशांनी वाढ झाली आहेत. 15 तारखेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत तीन रुपयांनी वाढ करण्यात आली होती आणि आता अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Diesel rate) दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. आज (मंगळवार) सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर पुढीलप्रमाणे…
Mumbai
पेट्रोल- 107.49
डिझेल- 94.02
Nagpur
पेट्रोल 108.06
डिझेल 94.63
Bhandara
108.69 (पेट्रोल नवा दर)
95.24 (डिझेल नवा दर)
Pune
Petrol- 107.86 (91 पैशांनी वाढ)
Disel – 94.40 (94पैशांनी वाढ )
Solapur
पेट्रोल : 108.21
डिझेल : 94.75
Nashik
पेट्रोल : 108.84
डिझेल : 95.35
Ratnagiri
पेट्रोल – 109.53
डिझेल – 96.06
Parbhani
पेट्रोल:- १०९.४९ पैसे
डिझेल:- ९५.९६ पैसे
Kolhapur
पेट्रोल- 108.37
डिझेल- 94.93
Washim
डिझेल दर- 95.49
पेट्रोल दर- 108.95
Amravati
पेट्रोल – 109.15
डिझेल – 95.68
Gondia
पेट्रोल – 109.54
डिझेल – 96.08
Sindhudurg
पेट्रोल – 109.55
डिझेल – 96.07
Raigad
पेट्रोल – 108.82
डिझेल – 95.30
Goa
पेट्रोल – 101.25
डिझेल – 92.99
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
पुणेकरांच्या खिशाला कात्री! CNGच्या दरात मोठी वाढ; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
Video! पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीने नागरिकांचा संताप; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये…