RSS ने फक्त शैक्षणिक संस्थाच नव्हे तर ते व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतला : राहुल गांधी

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली : ‘धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण खातं चालवलं नाही, ते फक्त RSS ने चालवलं. देशातील विद्यापीठांचा प्रत्येक कुलगुरू हा RSS चा माणूस आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला आहे.

राहुल गांधी पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर लोकसभेत बोलतांना अत्यंत आक्रमक पद्धतीने भाजपवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी आज भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती प्रहार केला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अत्याचारावरून राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनीच विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला. यानंतर संसदेमध्ये अभूतपूर्व गदारोळ उडाला. या संदर्भात पुरावे देण्याची मागणी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

राहुल गांधी म्हणाले, ‘RSS ने फक्त शैक्षणिक संस्थाच ताब्यात घेतलेल्या नाहीत, तर ते व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतला आहे. धर्मेंद्र प्रधान हे कधीच शिक्षण मंत्रालय चालवत नव्हते. जी व्यक्ती आणि संघटना शिक्षण खातं चालवत होती, ती फक्त RSS होती. भारतातील सर्व विद्यापीठांचा कुलगुरू हा RSS चा माणूस आहे. त्यामुळे तुमचा खरा शत्रू हा धर्मेंद्र प्रधान नसून हा RSS आहे. मुलांच्या पालकांना भाजपसमोर उभं राहण्याची हिंमत होत नव्हती, मात्र तरीही या हिंमतवान मुलांनी यांच्यासमोर उभं राहण्याचं धाडस दाखवले. या देशाचा जो गृहमंत्री, तथाकथित गृहमंत्री आहे, त्याची हिंमत नाही की संसदेत येऊन बसेल. गृहमंत्री थरथरत आहेत म्हणूनच ते संसदेत आलेले नाहीत.’

दरम्यान, राहुल गांधी यांनी ‘अंधभक्त’वरून केलेल्या व्याख्येवरूनसुद्धा सत्ताधारी सदस्यांनी गदारोळ घालत त्यांना भाषणापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल गांधी यांनी आपला संताप व्यक्त केला. जर अशा पद्धतीने भाजपच या देशामध्ये बोलणार असेल, तर मी संसदेमध्ये शांत बसतो, असे ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सत्ताधाऱ्यांना आवाहन करत राहुल गांधी यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं आवाहन केले. मात्र, राहुल गांधी यांनी एका विद्यार्थ्यांनं सांगितलेली गोष्ट सांगताना ‘इडियट’ या शब्दाचा उल्लेख केला. या ‘इडियट’ शब्दावरूनही प्रचंड गदारोळ उडाला. त्याचबरोबर त्यांनी अंधभक्तांची व्याख्या करतानाही केलेल्या प्रयोगावरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच राग अनावर झाल्याचे दिसून आले.

कंगना रनौतची जेन-झींबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य…

वादग्रस्त वक्तव्य! मी आजही सांगतो की नेहरू रंगेल होते, तर ते रंगेलच होते…

…आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *