निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी; शिवसेना ही शिवसेनाच…

uddhav-thackeray
Share

मुंबई: शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक चिन्हाबाबत मोठी मागणी केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र ‘दैनिक सामना’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी निवडणूक आयोग, भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

नीट पेपरफुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील अनेक ठिकाणी विद्यार्थी-तरुणांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘जेव्हा शिवसेना हा पक्ष फोडला, पक्ष चोरला तेव्हापासून शिवसेनेचं नाव आणि निशाणी एका गद्दाराला दिली. खरं तर निशाणी ही गोठवली पाहिजे आणि नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाच्या प्रमुखाला नाही आणि ते मानायला मी तयार नाही. शिवसेना हे नाव माझ्या वडिलांनी दिलेलं आहे. ते बदलण्याचा अधिकार देशात कोणालाही नाही आणि मी ते मान्यच करणार नाही. शिवसेना ही शिवसेनाच आहे. दुसरी आहे ती शहासेना आहे. त्याला तुम्ही शहासेना नाव द्या आणि कोणतंही चिन्ह द्या. तोफ द्या, अणुबॉम्ब द्या, राफेलचं विमान द्या, ते मला चालेल. आताचे सरन्यायाधीशच अलीकडं म्हणाले होते की, न्याय नाकारणे म्हणजे न्याय नष्ट करण्यासारखं आहे.’

भाजपवर टीका करताना त्यांना कारभार करताच येत नाही असा हल्लाबोल उद्धव यांनी केला. सत्ता कशासाठी पाहिजे हेच त्यांना कळत नाही. सत्तांध झाले आहेत. सत्ता मिळवणं, त्यासाठी निवडणूक लढणं हा राजकारणाचा भाग आहे. त्यात काही गैर नाही, पण लोकांनी मतदान केल्यानंतरही तुम्ही फोडाफोडी करताय, असा संतप्त सवाल उद्धव यांनी केला. तु्म्ही पेपर फोडताय. दानपेट्या फोडताय. तुमच्याकडे बहुमत आहे. १२ वर्षे तुम्ही पंतप्रधान आहात. इथं महाराष्ट्रात १२ वर्षातली मधली माझी अडीच वर्षे सोडली तर गद्दारीच्या जोरावर त्यांचंच सरकार चाललेलं आहे. यांना नेमकं करायचंय काय हेच समजत नाही. चांगलं काही करायचं असेल तर फोडाफोडी का करताय? ठीक आहे. त्यांचा हिशोब नक्कीच करू असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेना ठाकरे गटाला निकालानंतर आणखी एक मोठा धक्का…

उद्धव ठाकरे मैदानात! राम मंदिरातील चोरीचा पैसा पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *