चर्चांना उधाण! बारामतीचा 2029 मध्ये उमेदवार कोण? जय पवार यांनी स्पष्ट सांगितलं…

ajit-pawar-jay-pawar
Share

बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. आज (गुरुवार) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. सुप्रिया पवारांसह पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बारामती विधानसभेच्या आगामी उमेदवाराबद्दल मोठं भाष्य केलं आहे. यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. खरं तर, अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीचा उमेदवार कोण असेल? असा प्रश्न विचारला जात होता. इथं पवार कुटुंबातून अनेकांची नावं समोर येत होती. मात्र राजकीय स्थिती पाहता ही माळ सुनेत्रा पवार यांच्या गळ्यात पडली. पोटनिवडणुकीत त्या उभ्या असल्या तरी २०२९ मध्ये त्या पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरतील, याबाबत काहीही स्पष्टता नाही.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

बारामतीचा २०२९ मध्ये उमेदवार कोण असेल? हे अद्याप अनुत्तरित आहे. मागील निवडणुकीत इथं अजित पवारांविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आता दादा गेल्यानंतर युगेंद्र पवार बारामतीची सूत्रे आपल्या हाती घेतील, अशी चर्चा असताना आता इथं जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचं वक्तव्य जय पवार यांनी स्वत: केले आहे.

जय पवार म्हणाले की, ‘अजित पवार यांच्या विमान अपघाताचा अहवाल येण्यास वर्ष लागेल. मात्र आम्ही आमच्या पद्धतीने फॉलोअप घेत आहोत. सीआयडी चांगलं काम करत आहे. आमचा त्यांच्याशी संपर्क आहे. मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिला आहे की ते यात लक्ष घालतील. अपघातसंदर्भात खरी माहिती समोर येत नाही तो पर्यंत हा अपघात आहे की घात आहे त्यावर बोलणार नाही. पुरावे हाती आल्यानंतर त्यावर भूमिका मांडेन. कुठल्याही चुकीच्या गोष्टी बोलणार नाही.’

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सुनेत्रा पवार यांनी महत्वाचं विधान…

अजितदादांवरची चित्रफित पाहून सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात…

पार्थ पवार यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…

रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…

Video: पार्थ पवार यांची राज्यसभा खासदार म्हणून शपथ! पण कार्यकर्त्यांचे पाणावले डोळे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *