Video! भाजप उमेदवारांना रस्त्यावर पळवून पळवून मारलं…

Share

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी आज (गुरुवार) मतदान होत आहे. मतदानाच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. भाजप उमेदवारांवर झालेले हल्ले, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजप कार्यकर्त्यांमधील चकमकी तसेच देशी बॉम्बच्या स्फोटांनी लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

दक्षिण मिदनापूरमधील कुमारगंज मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुवेंदु सरकार यांच्यावर जमावाने भीषण हल्ला केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुवेंदु सरकार हे जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक असूनही जमावाने त्यांना गाठून बेदम मारहाण केली. दुसरीकडे आसनसोल दक्षिण मतदारसंघाच्या भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवरही बर्नपूरच्या रहमतनगर भागात हल्ला झाला. एका मतदान केंद्रातून बाहेर पडताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये कारची मागील काच फुटली. अग्निमित्रा यांनी हिरापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

मुर्शिदाबादमधील नौदा भागात बुधवारी रात्री उशिरा देशी बॉम्ब फेकण्यात आले. ज्यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले. गुरुवारी सकाळी ‘आम जनता उन्नयन पार्टी’चे (AJUP) प्रमुख हुमायूं कबीर घटनास्थळी पोहोचले असता टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला. पोलीस टीएमसी कार्यकर्त्यांसोबत मिळून गुंडगिरी करत आहेत आणि आमच्या समर्थकांना मारहाण केली जात आहे, असा आरोप करत कबीर धरणे आंदोलनाला बसले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

सिलीगुडीमध्येही भाजप आणि टीएमसी कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मालदा येथील एका बूथवर ईव्हीएम खराब झाल्यामुळे मोठा गदारोळ झाला, नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेरून संताप व्यक्त केला. दरम्यान हिंसाचाराचे सावट असूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. ज्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.

भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल; बळजबरी ठेवले शारीरिक संबंध…

भाजपचा राज्यसभा डाव जाहीर; रामदास आठवले यांना पुन्हा संधी, चार उमेदवारांची घोषणा

पश्चिम बंगालमध्ये सत्ता कुणाची येणार! सी-व्होटर सर्वेक्षणात भाजप आघाडीवर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *