संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
पुणे (संतोष धायबर) : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कुंड्यांमधील झाडे पाण्याअभावी कोमेजल्याची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधित कुंड्यांना पाणी घालण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महापौर, नगरसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचला होता. त्यानंतर संबंधित विभागाला तातडीचे आदेश देण्यात आले आणि वाळू लागलेल्या रोपांना अखेर जीवदान मिळाले आहे.
दरम्यान, या घटनेची महापालिका परिसरात जोरदार चर्चा रंगली असून, बातमी व्हायरल झाल्यानंतर अनेकांचे लक्ष प्रवेशद्वारावरील कुंड्यांमधील झाडांकडे वेधले गेले. पर्यावरण संवर्धन आणि हरित शहराच्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या मुख्य दारातच झाडांची अशी अवस्था झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. विशेष म्हणजे, ही बाब समोर आणणारे पत्रकार संतोष धायबर यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. सामाजिक जबाबदारी जपत प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधल्याबद्दल अनेकांनी कौतुक केले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या बातमीत पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सजावटीसाठी ठेवलेल्या कुंड्यांतील झाडे पूर्णपणे कोमेजल्याचे वास्तव समोर आले होते. अनेक कुंड्यांतील माती कोरडी पडली होती, तर काही झाडांची पाने करपलेली दिसत होती. शहर हरित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या प्रशासनालाच स्वतःच्या प्रवेशद्वारावरील झाडांची देखभाल करता आली नाही, अशी टीका नागरिकांकडून करण्यात आली होती.
महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून दररोज वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी ये-जा करत असतानाही या झाडांकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तातडीने हालचाली करत झाडांना पाणी देण्याची मोहीम हाती घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली जाणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
बातमीची तत्काळ दखल! पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावरील कुंड्यांना मिळाले ‘जीवदान’https://t.co/rHMAFnyUhw@PMCPune @SunetraA_Pawar @mohol_murlidhar @Dev_Fadnavis @RRPSpeaks @PawarSpeaks pic.twitter.com/xIZTa8jjb5
— mahabharat news (@mahabharatnewss) May 20, 2026
पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक संतप्त; हरित शहराचा फाटला बुरखा…
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात सावळागोंधळ…
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाचे? खासगी की सरकारी?
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय गोंधळामुळे चर्चेत!