पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकमधे दाखल करण्यात आले आहे. सततच्या दौऱ्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल्याची माहिती मिळाली आहे.
शरद पवार हे पुढील दोन दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्येच आराम करणार आहेत. सर्व चाचण्या केल्यानंतर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. बाबांना रुबी हॉलमध्ये दाखल केले आहे. काही चाचण्या केल्या जात असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांन दिली आहे. मी तुम्हाला सर्वांना याबाबत अपडेट देत राहीन, असे सुळे म्हणाल्या.
View this post on Instagram
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमधे उपचारांसाठी भरती झाले आहेत. नियमित चेक अप करण्यासाठी आणि फुफ्फुसांमधे वेदना होत असल्याने शरद पवार रुग्णालयात भरती झाल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रांट यांनी दिली. शरद पवार यांचा सोलापूर, धाराशिव, बीड आणि इतर दुष्काळी भागाचा दौरा सुरू होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव आज शरद पवार दौरा अर्धवट सोडून माघारी आले आणि पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधे उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
दरम्यान, शरद पवार यांनी शनिवार 31 ऑक्टोबर आणि रविवार 1 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तुळशी गाव आणि पंढरपूर तालुक्यातील दुधाळी गावाला भेट दिली होती. यावेळी तुळशी गावात त्यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला होता. येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या होत्या. या समस्या सरकार दरबारी मांडण्याचं आश्वासनही त्यांनी दिले होते.
शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी अन् फुटला अश्रूंचा बांध…
One thought on “शरद पवार दौरा अर्धवट सोडून माघारी; रुग्णालयात दाखल…”