मनोज जरांगे लवकरच 4 बॉम्ब टाकणार; षडयंत्र सुरू आहे…

manoj-jarange
Share

नांदेड : “सध्या मराठ्यांचा एकही बांधव विरोधात बोलत नाही. म्हणून सरकार नवीन टीम बोलावून घेत आहे. त्यात महिला आणि माणसं विकत घेत आहेत, मला बदनाम करण्यासाठी. मराठा समाजात फूट पाडण्यासाठी सरकारकडून महिला आणि लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र सुरू आहे, पण आता लवकरच आणखी चार बॉम्ब टाकणार आहे, अनेकांची नावे उघड करणार आहे, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

“त्यांचं काम आहे आम्हाला शरण यायला लावणं. सरकारला वाटतंय की आम्ही मॅनेज होत नाही, त्यांचं ऐकत नाही. वारंवार आणखी टीम बोलवायची, मराठ्यांच्या विरोधात बोलायला लावायचं. ज्याला ज्याला बोलायला लावत आहेत, त्याला मी राजकीय करिअरमधून शंभर टक्के संपवणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे लोक आहेत. हे त्यांना बोलावून घेत आहेत, त्यांना फूस लावत आहेत, त्यांना बदनाम करण्यासाठी आंदोलनाच्या विरोधात बोलायला लावत आहेत. सध्या मराठ्यांचा एकही बांधव विरोधात बोलत नाही. म्हणून सरकार नवीन टीम बोलावून घेत आहे. त्यात महिला आणि माणसं विकत घेत आहेत, मला बदनाम करण्यासाठी. हे समाजाने समजून घ्या. सरकार आपलेच लोक आपल्या पाठीशी लावत आहे, हे मराठा समाजाने समजून घ्यावे, असा आरोप जरांगे यांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मुख्यमंत्री साहेबांनी सांगावं, मागच्या महिन्यात 3 तारखेला महिलांना भेटले की नाही? मी नाव सांगणार नाही, माझे सोर्स आहेत. फडणवीस साहेबांनी विश्वासाचा माणूस पाठवावा, मी नावासहित लिहून देतो. तुम्हाला हे लोक भेटले आहेत. आता बुधवारी तुम्ही कोणाकोणाला बोलावलं, कोणत्या OSD ला फोन आला होता? त्यांच्या तोंडून मला अपमानित करायचं होतं. लई गाभाळ आहे माझ्याकडे. मी एक बॉम्ब टाकलाय, आणखी चार आहेत. आणखी बॉम्ब टाकला तर हे धीरच धरणार नाहीत. लोक त्यांच्याकडूनच मंत्रिपद घेतात, आमदारकीची तिकीट घेतात आणि मग त्यांचीच टिंगल करतात. इतके तुच्छ शब्द बोलतात. लोक त्यांच्यापासूनच मोठे झालेले आहेत, असे म्हणत जरांगेंनी इशारा दिला आहे.

एकनाथ शिंदेंनी ५०० कोटी रुपये देऊ केल्याच्या जरांगे यांच्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

रामदास कदमांची मनोज जरांगेंवर जहरी टीका; उपोषणाला बसल्यावर गुपचूप खातोस…

मनोज जरांगे यांना आणखी एक झटका, चौकशीचा फास आणखी आवळला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!