चर्चांना उधाण! शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातमीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

supriya-sule
Share

मुंबई : शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’ सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे, यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या निवृत्तीबाबत सुळे म्हणाल्या की, शरद पवार निवृत्त होणार नाही. कोणी निवृत्त व्हायचं, हे जनता ठरवणार, शरद पवार यांच्या राज्यसभेची 5 वर्ष अजून बाकी आहेत, तेव्हा शरद पवार निवृत्त कसे होतील? असंही पुढे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

शरद पवार यांच्या संदर्भात एका वृत्तपत्रात छापून आलेल्या बातमीवर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांबद्दल अशा पद्धतीने निवृत्तीच्या बातम्या येत असतील तर हे संतापजनक आहे.’ संजय राऊत म्हणाले, ‘शरद पवार यांचे राजकारण हे धर्मांध शक्तीविरूद्ध लढण्यात गेले आहे. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार जिवंत ठेवण्यात त्यांचे आयुष्य गेले. सत्तेत जाण्याची घाई काही लोकांना झाली असेल आणि शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार गुंडाळला जात असेल तर योग्य नाही. शरद पवार असं करतील असं वाटत नाही. तुम्ही आराम करा, तुमचा पक्ष फोडला आहे. ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांना आराम करण्याचा सल्ला देताय, लाज वाटली पाहिजे. मोदी ज्याप्रकारे देश सांभाळत आहेत, म्हणून तर विरोध होतोय. सुप्रिया सुळे एनडीएसोबत जातील असं वाटत नाही. त्या प्रखर फुले आंबेडकर विचारांच्या आहेत.’

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

काही दिवसांपूर्वी शरद पवार हे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच अचानक त्यांची तब्येत बिघडली होती, त्यांना खोकला, कफ आणि अशक्तपणा आल्यानंतर त्यांना आधी पुण्यात आणि नंतर मुंबईत उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते, त्याचवेळी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन केला होता, तेव्हा ‘आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोनवर म्हटले होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी हा फोन केला होता. पवार यांच्या निवृत्तीचे स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिले, असा त्याचा अर्थ काढला गेला होता. त्यामुळे मोदींच्या त्या वक्तव्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात केली गेली.

शरद पवारांच्या निवृत्तीबाबत समोर आलेल्या बातमीमध्ये काय म्हटले पाहा…
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती करावी व त्यांच्या जाहीर पक्षाने भाजपप्रणित ‘एनडीए’त सहभागी व्हावे यावर त्यांच्या पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. शरद पवार यांचा पक्ष ‘एनडीए’ सोबत जाण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधिकच उधाण आले असताना आता शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याची कारणं देताना वृत्तसंस्थेने लिहलंय की, शरद पवार हे १२ डिसेंबर रोजी ८६ वर्षांचे होत आहेत. सहा दशकांहून अधिक काळ ते राजकारणात आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदापासून अनेक पदे त्यांनी भूषविली. वयाच्या या टप्प्यावर भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्यास आतापर्यंतच्या भूमिकेला तो मोठा छेद असेल. हे टाळायचे तर त्यांनी निवृत्ती घ्यावी व त्यांच्या कन्या खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आदींनी एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा अशा शक्यतेची चाचपणी केली जात आहे. नेमका निर्णय काय घ्यायचा हे अद्याप ठरलेले नाही. भाजपच्या नेतृत्वाशीही पक्षाच्या काही नेत्यांनी या संदर्भात चर्चा केली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचंही वृत्तसंस्थेने लिहलं आहे. ‘आपण विश्रांती घ्या सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी शरद पवार यांना फोनवर म्हटले होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मोदी यांनी हा फोन केला होता. पवार यांच्या निवृत्तीचे स्वतः पंतप्रधानांनी संकेत दिले, असा त्याचा अर्थ काढला गेला होता.

शरद पवार दौरा अर्धवट सोडून माघारी; रुग्णालयात दाखल…

एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता शरद पवारांनी फेटाळली

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्यानंतर शरद पवार म्हणाले…

शरद पवार यांच्याकडून १० प्रवक्त्यांची यादी जाहीर; पाहा नावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!