अशोक खरात प्रकरणावरील चित्रपटावर रुपाली चाकणकर संतापल्या…

rupali-chakankar
Share

मुंबई : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्यांवर चित्रपट येणार असून या चित्रपटात रुपाली चाकरणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिसणार आहे. या चित्रपटासंदर्भात रुपाली चाकणकर यांनी प्रथमच भाष्य केले आहे. लवकरच कायदेशीर कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलणार आहे, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक या भोंदू खरातचे भक्त असल्याचा समोर आले आहे. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आले होते. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

रुपाली चाकणकर म्हणाल्या, ‘जो कथित सिनेमा येतो आहे ते प्रकरण न्यायालयात प्रलंबीत आहे. एखादे पात्र साकारताना सबंधित पात्राची परवानगी घेणे आवश्यक असते माझी कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधताही मी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलणार आहे. खरात प्रकरणात आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार आहे. खरात प्रकरणात माझ्यावर आणि कुटुंबियांवर वाटेप तसे आरोप करण्यात आले. कुटुंबियांना टार्गेट करण्यात आले. माझी मुलं शैक्षणिक क्षेत्रात असूनही त्यांच्यावरही वाटेल तसे आरोप करण्यात आले. मी आशा मिरगे यांना त्यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांना नोटीसा पाठवलेल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. दिल्ली हायकोर्टातही मी याचिका दाखल केलेली आहे. त्यात रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा गेलेल्या आहेत. 10 जुलैला दिल्ली हायकोर्टात मी स्वतः हजर राहणार आहे. तसेच काही यूट्यूब चॅनेल्स आहेत, त्यांच्याविरोधातही आम्ही कोर्टात जाणार आहे.’

चर्चांना उधाण! अजितदादा गेल्यानंतरचा पहिला वर्धपानदिन अन् रुपाली चाकणकर यांची दांडी…

संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न : रुपाली चाकणकर

अशोक खरात याची दुसरी बाजू माहीत नव्हती : रुपाली चाकणकर

अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या…

खळबळजनक आरोप! रूपाली चाकणकर यांचे अशोक खरात याला 177 कॉल्स…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *