तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी; मंत्र्याकडे लेखी तक्रार…

tukaram-mundhe
Share

छत्रपती संभाजीनगर: अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट खातेनिहाय मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

१५ जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनात कर्मचाऱ्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळी ९ ते थेट रात्री १२ वाजेपर्यंत काम करावे लागत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

तक्रारदार कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रयोगशाळेत आधीच मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. अशा स्थितीत तांत्रिक संसाधने आणि अतिरिक्त मनुष्यबळ न देता कामाची वेळ वाढवल्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश (BP) आणि USP यांसारख्या उच्च मानकांनुसार अन्न व औषध नमुन्यांची अचूक तपासणी करण्यासाठी ठराविक वेळ आवश्यक असतो. मात्र, प्रलंबित नमुने निकाली काढण्याच्या घाईत विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे…
– दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय त्वरित रद्द करून पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी.
– सुट्ट्यांच्या दिवशी कामाला बोलावणे बंद करावे.
– अतिरिक्त काम करून घ्यायचे असल्यास योग्य भत्ते आणि सुविधा देण्यात याव्यात.
– घाईगडबडीत नमुने तपासून गुणवत्तेशी तडजोड करू नये.

दरम्यान, या तक्रारपत्रावर प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या असून, आता या वादावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई; 24 तासात 10 परवाने निलंबित…

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; FDAची मोठी कारवाई अन् दुकान सील…

तुकाराम मुंडे यांच्या FDAला हायकोर्टाचा मोठा दणका…

तुकाराम मुंढे यांची मुंबईतील ६ मोठ्या हॉटेल्सकारवाई; थेट परवाने रद्द…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *