व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त! LPG बुक करण्याआधी वाचा नियम…

gas-cylinder
Share

नवी दिल्ली: व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात 183.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आज (बुधवार) सकाळपासून नवे दर लागू झाले आहेत. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने वाढ होत होती. जानेवारी महिन्यापासून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल सातवेळा वाढ झाली होती. 1 जानेवारीपूर्वी 19 किलोच्या सिलेंडरचा दर 1580 रुपये होता. 1 जूनला तोच दर आता 3113.50 रुपयांवर पोहोचला होता. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात जानेवारी महिन्यात 111 रुपये, फेब्रुवारीत 49 रुपये, मार्चमध्ये 28 रुपये, 7 मार्चला 114.50 रुपये, एप्रिल महिन्यात 195.50 रुपये, मे महिन्यात 993 रुपये आणि जून महिन्यात 42 रुपयांची वाढ झाली आहे. तर छोटे व्यावसायिक आणि नागरिकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या 5 किलोच्या सिलेंडरचा दर 821.50 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी लागू करण्यात आलेली 183 आणि 13 रुपयांची दरकपात व्यावसायिकांसाठी किंचित दिलासा ठरणार आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील लागू केलेले सर्व निर्बंध हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने वाहतूक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला होता. व्यावसायिक वापरासाठीचे पेट्रोल आणि डिझेल रिटेल विक्रेत्यांकडून घेण्यावर निर्बंध होते. डिझेल विक्री प्रति ग्राहक 200 लिटरपर्यंतच अशी मर्यादा लागू करण्यात आली होती. 12 जून रोजी हे निर्बंध लावण्यात आले होते. ब्लॅक मार्केटिंग थांबवण्यासाठी तसेच रिटेल वापरासाठीचे इंधन व्यावसायिक वापरासाठी वळवले जाऊ नये, यादृष्टीने हे निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता हे सर्व निर्बंध दूर करण्यात आले आहेत.

LPG बुक करण्याआधी वाचा नियम…
१ जुलै २०२६ पासून सर्वसामान्यांच्या खिशाशी संबंधित अनेक आर्थिक नियम बदलले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या बजेटवर आणि जीवनावर होणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरशी संबंधित आहेत. एलपीजी सिलेंडरशी संबंधित नियमांमध्ये आजपासून बदल करण्यात आले आहेत.

इंडेन (Inden), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी गॅस (HP Gas) या सरकारी तेल कंपन्यांनी सिलिंडर बुकिंग, डिलिव्हरी प्रक्रिया आणि पीएनजी (PNG – पाईप्ड नॅचरल गॅस) सेवांबाबत नवीन नियम लागू केले आहेत. गॅस सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. जर तुम्ही नवीन कनेक्शन घेणार असाल किंवा सिलिंडर बुक करणार असाल, तर हे नवीन नियम माहित असायला हवेत.

१ जुलैपासून एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी ‘ओटीपी व्हेरिफिकेशन’ (OTP Verification) अनिवार्य करण्यात आले आहे. तुम्ही सिलिंडर बुक केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) पाठवला जाईल. जेव्हा डिलिव्हरी बॉयहोम डिलिव्हरीसाठी येईल, तेव्हा त्याला हा ओटीपी सांगावा लागेल. बुकिंगची पावती हरवली तरीही केवळ योग्य ओटीपी दिल्यानंतरच सिलिंडर सुपूर्द केला जाईल. गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. सरकारने e-KYC करणे अनिवार्य केले आहे. ज्या ग्राहकांनी ३० जून २०२६ पर्यंत आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांची सबसिडी रोखली जाऊ शकते. ही सबसिडी थेट ग्राहकांच्या e-KYC लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे सबसिडी सुरू ठेवण्यासाठी त्वरित e-KYC करणे आवश्यक आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे पीएनजी (PNG) कनेक्शन आहे आणि तरीही त्यांनी एलपीजी सिलिंडर ठेवला आहे, त्यांच्यासाठी महत्त्वाचा नियम लागू झाला आहे. अशा ग्राहकांना आपले पीएनजी कनेक्शन अॅक्टिव्ह ठेवावे लागणार आहे. तर, ३० दिवसांच्या आत घरातील एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सीकडे जमा करावा लागणार आहे. सिलिंडर जमा केल्यावर त्यांना एक ‘ट्रान्सफर व्हाउचर’ दिले जाईल. भविष्यात जर ग्राहक इतरत्र शिफ्ट झाला आणि तिथे पीएनजी सेवा नसेल, तर या व्हाउचरचा वापर करून पुन्हा एलपीजी कनेक्शन मिळवता येईल.

पीएनजी ग्राहकाने सलग २ महिने गॅसचे बिल भरले नाही, तर त्याचे कनेक्शन तात्काळ खंडित केले जाऊ शकते. बिल पूर्ण भरल्यानंतरच कनेक्शन पुन्हा सुरू केले जाईल. याशिवाय, जर ग्राहकाने पीएनजी पाईपलाईन किंवा गॅस वाल्व्हचे (Valve) जाणूनबुजून नुकसान केले, तर त्याची संपूर्ण भरपाई ग्राहकाकडूनच वसूल केली जाईल.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ…

महागाईचा झटका! CNG महागला, घरगुती गॅसचं काय? पाहा नवीन दर…

मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? : राहुल गांधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *