मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (ता. २८) विमान अपघातात अपघाती निधन झालं. मुंबईवरून बारामतीला जात असताना विमानाचा बारामती एअरपोर्टवर लँडिंग करताना अपघात झाला. धुक्यामध्ये काहीही न दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. परंतु, अजित पवार यांच्या विमानाचे मयत कॅप्टन सुमित कपूर यांच्या जी. एस. ग्रोवर या मित्राने धक्कादायक माहिती दिली आहे. मित्राने केलेल्या दाव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांचे विमान दुसराच पायलट चालविणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या एका वैमानिकाची निवड केली होती. मात्र, तो वैमानिक विमानतळावर मुंबईत वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याला उशीर होत होता. तर दुसरीकडे अजित पवार यांना उशीर होत असल्याने कंपनीने कॅप्टन कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली. कॅप्टन सुमित कपूर यांना 15000 हून अधिक तास विमान उडवण्याचा अनुभव होता.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
कॅप्टन सुमित कपूरचे मित्र म्हणाला, सुमीत एक अत्यंत अनुभवी पायलट होता आणि अशी चूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यांनी अपघाताची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कॅप्टन सुमित कपूर काही दिवसांपूर्वीच हाँगकाँगहून परतला होता. अपघाताच्या काही तास आधी त्याला विमान उड्डाणाची माहिती मिळाली होती, अशी माहिती कॅप्टन सुमितचे मित्र जी. एस. ग्रोवर यांनी दिली आहे.
दरम्यान, विमानातील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये कॅप्टन सुमित कपूर, सह-वैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदिप जाधव यांचा समावेश आहे. कपूर यांचा अपघात झाला ही बातमी ऐकल्यावर सुरुवातीला कोणाचाच विश्वास बसला नाही. ते अत्यंत अनुभवी आणि शिस्तप्रिय वैमानिक होते. त्यांच्यासारख्या व्यक्तीसोबत असे घडू शकते, हे पचवणे कठीण असल्याचं कॅप्टन कपूरच्या मित्राने म्हटले आहे.
अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…
‘कामाचा माणूस’ अजित पवार अनंतात विलीन; जमावाला अश्रू अनावर…
विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…
Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…
अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…