राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे निधन…

shantilal-suratwala
Share

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला (वय ७६) यांचे आज (शुक्रवार) पहाटे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ते कॅन्सर या आजाराशी झुंज देत होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

शांतीलाल सुरतवाला यांनी १९९२ ते १९९३ या कालावधीत पुण्याचे महापौर पद भूषवले होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. महापौर म्हणून काम करताना त्यांनी सर्वसामान्य पुणेकरांचे प्रश्न सोडवण्याला नेहमीच प्राधान्य दिले. एक संयमी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

राजकीय प्रवासात सुरतवाला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जात असे. पक्षाच्या पडत्या काळात आणि संघटना बांधणीत त्यांनी पुण्यात मोलाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादी पक्षातील तरुण कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक ठरले.

दरम्यान, राजकारणाव्यतिरिक्त शांतीलाल सुरतवाला हे पुण्यातील एक प्रथितयश उद्योजक होते. पुण्यातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक होता. व्यापार क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा त्यांनी अनेक सामाजिक संस्थांना देखील करून दिला. कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच त्यांनी सार्वजनिक जीवनात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता.

अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…

‘कामाचा माणूस’ अजित पवार अनंतात विलीन; जमावाला अश्रू अनावर…

विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…

Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…

अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…

अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…

हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…

विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *