मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे बारामती येथे विमानाचे लँडींग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला अन् अजित पवार यांच्यासह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर अपघाताची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधींशांच्या अधिपत्याखाली चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही काही प्रश्न उपस्थित करत, या अपघातानंतर राष्ट्रवादीतील प्रमुख तीन नेते मौन का बाळगून आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.
View this post on Instagram
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत. पण, खूप दूरच्या सीसीटीव्हीमध्ये विमान घिरट्या घालताना स्पष्ट दिसत होते. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करु असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही? अजित दादांच्यानंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगलं आहे? असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. साहेबांचे राष्ट्रवादीतलेही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
दरम्यान, शरद पवार यांनी संबंधित अपघाताच्या घटनेवर परखडपणे भाष्य करत, हा निव्वळ अपघात असून यामागे कुठलेही राजकारण आणू नये, असे म्हटले होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमान अपघाताच्या चौकशीची मागणी करण्यासंदर्भात नागरी उड्डाणमंत्र्यांना पत्रही दिले आहे. मात्र, या घटनेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही संबंधित घटनेचं सत्य जनेतसमोर यायला हवे, त्यासाठी चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी केली आहे. आता, सुषमा अंधारे यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…
‘कामाचा माणूस’ अजित पवार अनंतात विलीन; जमावाला अश्रू अनावर…
विमानात बसण्यापूर्वी अजितदादा यांचा पत्नी सुनेत्रा पवार यांना शेवटचा फोन; म्हणाले…
Video: पाणावलेले डोळे, आवंढा गिळत शरद पवार पुतण्याबद्दल म्हणाले, अजित…
अजित पवार यांची घड्याळावरुन पटली ओळख; थरारक कहाणी…
अहमदाबाद विमान अपघाताचा Video रेकॉर्ड करणारा पोलिसांच्या ताब्यात…
हृदयद्रावक! विमानाच्या शेपटीत एअर होस्टेसचा मृतदेह पाहून डोळ्यात अश्रू…
विमानातून बचावलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला थरार! एअर होस्टेस जळत होत्या…
दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू; नुकतंच झालं होतं लग्न…