अजित पवार अपघात प्रकरण! रोहित पवार दिल्लीत करणार मोठा खुलासा…

rohit-pawar
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी विरोधकांनी घातपाताचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे या प्रकरणी धक्कादायक आरोप आणि पुरावेच सादर केले होते. आता या प्रकरणी काही महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे मांडायचे आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे.

रोहित पवार यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक खुलासे केले आहे. आता रोहित पवार हे दिल्लीला जाणार आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १२ वाजता ते दिल्लीत पत्रकार परिषद घेणार आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

“बारामती येथील विमान अपघातात अजितदादांच्या झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत माझ्या मनात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात अनेक शंका आहेत. या संदर्भात, उद्या बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता दिल्लीतील प्रेस क्लब येथे मी एक पत्रकार परिषद घेणार असून, त्यामध्ये काही महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे सविस्तरपणे मांडणार आहे.” असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रोहित पवार अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये काय खुलासे करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल माहिती देत असताना आदल्यादिवशी मुंबईत काय घडलं होतं, याची माहिती दिली. “कदाचित घातपात असण्याची शक्यता आहे. २७ जानेवारी रोजी वेळापत्रकानुसाार दादा संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्यात येणार होते. ताफा देखील लागला होता. पण दादा निघाले नाहीत. पण गाडीने जाऊ शकले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीचं विमान २७ तारखेला बूक केले होते. पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलीवर सही करायची होती. त्या फाईलीवर सही करायची होती. दादा एका मोठ्या नेत्याला भेटणार होते, त्या नेत्याला यायला उशीर झाला का. दादांचा मोबाईल चेक करा, लँडलाईन फोन चेक करा. त्या फाईलीवर सही करायची होती, दादा कोणतीही फाईल रिकामी ठेवत नाही. ती फाईल मंत्रालयात होती. दादांच्या केबिनमध्ये दादांनी ती फाईल बोलावली, त्यामुळे येईपर्यंत वेळ गेला, ती फाईल आली. एक मोठा नेता बोलत असेल तर दादांनी फाईलीवर सही केली. त्यामुळे दादांना यायला उशीर झाला आणि ते विमानाने आले होते’ असा धक्कादायक दावाही रोहित पवार यांनी केला आहे.

मोठी बातमी! अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी घेतला तिघांवर संशय; थेट नावे सांगितली…

तीन अनुभव! अजित दादांचा फोन आला; दादा नक्कीच अजून आहेत…

अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण अन् खळबळजनक दावा…

अजित दादांचा अपघाताच्या 8 मिनिटांआधी अखेरचा फोन, पाहा विमानातून काय म्हणाले…

विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर…, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय…

अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले अन् 10 दिवसात…

अजित दादा पवार तुमच्यासाठी महाराष्ट्र रडला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *