मुंबईः राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये रोहित पवार यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा जी यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे. अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो. ब्लॅक बॉक्सबाबत आम्ही शंका व्यक्त केली होती. अपघातानंतर पुन्हा स्फोट झाले, त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
माझ्या पत्रकार परिषदेनंतर तपास यंत्रणांच्या तपासाला वेग आला. त्यानंतर इतर नेते देखील पत्र द्यायला लागले, ही चांगली गोष्ट आहे. अजित पवार यांचा अपघात आहे की घातपात हे मी मांडलं होते. तसेच ब्लॅक बॉक्सबाबत मी एक विधान केले होते. ते देखील आता खरं होत आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याचं आता सांगण्यात येत आहे. आमच्यासारखा बिना बॅकग्राउंडचा, बिना सरकारमधील व्यक्ती एवढी माहिती गोळा करू शकतो, मग सत्तेतील लोकांना हे का शक्य नाही?, असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
अजितदादांच्या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला. यामध्ये अपघातानंतर मोठे स्फोट झाल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. विमान पडल्यानंतर काही वेळाच्या अंतराने स्फोट झाले होते. त्या विमानात अधिकचे इंधन होते. विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते, यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले, असा दावा रोहित पवार यांनी केला. तसेच वॉशरूम जवळ हे इंधन टँक होते. तिथेच ब्लॅक बॉक्स असतो, असेही रोहित पवार म्हणाले. सध्या ब्लॅकबॉक्स जळला असं सांगत असतील. तर ते केवळ मॅनिप्युलेशन सुरू आहे, असा आमचा आरोप आहे. आम्ही आज बोलणार होतो म्हणून काल यांनी काही माहिती समोर आणली, असेही रोहित पवार यांनी सांगितले.
CVR चा सरकारी नियम आहे की 2 तास संभाषण रेकॉर्ड झाले पाहिजे या विमानातील केवळ 30 मिनिटं होतं. हे विमान आधी खरेदी करण्यात आले आणि त्यानंतर रजिस्टर करण्यात आले. किती प्रकारे गैर प्रकार सुरू आहेत हे आपल्याला दिसत असेल. या विमानाचे 5 हजार तास उड्डाण करण्याचे तास होते. अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान 8 हजार तासांपेक्षा जास्त फ्लाय झाल्याची शक्यता आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले. पायलट कपूर आणि रोहित सिंग हे अनधिकृत दोन प्रकारचे विमान चालवत होते. याचे पुरावे देखील आहेत. जितका तपास पुढे जाईल तितकी आणखी सत्यता समोर येईल. रोहित सिंग नावाच्या पायलटचे 2 वेळा दारू पिलेला असल्यामुळे लायसन रद्द झाले होते. कॅप्टन कार्लोस हा व्हेंझुयलाचा रहिवासी आहे. भारतात प्रवासी म्हणून प्रवेश करतो आणि इकडे विमान चालवतो. मुळात अशी परवानगी नाही, असा खळबळजनक दावाही रोहित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. विमान अपघात तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झाले आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळाले आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत अशल्याचं सांगण्यात आले आहे.
अजित दादांच्या मृत्यूनंतर मंजूर केलेल्या फाईलचा रेट किती पाहा…
अजित पवार विमान अपघात! पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा CCTV समोर आणा…
अजित पवार यांचा घातपात की अपघात; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
अजित दादांच्या विमान अपघाताचे गूढ वाढतच चाललं; रोहित पवार यांचा नवा खुलासा…