मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर…

Share

मुंबईः राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज (बुधवार) जाहीर केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या 7 जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रातील संख्याबळानुसार भाजपचे 4 उमेदवार हमखास निवडून येऊ शकतात. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कालच भाजपने इतर राज्यातील उमेदवार जाहीर केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. राज्यसभेसाठी उद्या म्हणजे 5 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य…
शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक…
5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
6 मार्च – अर्जांची छाननी
9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

कसं असणार राज्यसभेतल्या जागांसाठीचं गणित?
राज्यसभेच्या एकूण जागा : 7

विद्यमान विधानसभा सदस्य : 286 (अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
(फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
(अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)

तीन जागांसाठी लागणार : 108
भाजपाकडे अतिरिक्त मते : 28
शिवसेना : 56

एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 20
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)

एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 4

महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त…म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.

उबाठा : 20

एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16
शरद पवार : 10

एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26
काँग्रेस : 16

एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *