मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर शाई दाखवण्याचा ट्रेंड होता पण आता बोटाची शाई पुसली जात असल्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मुंबईमध्ये बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाकरे बंधूंनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा शाई पुसली जात असल्याबद्दल खुलासा केला आहे. मार्कर पेन वापरले असल्याचं मान्य केले आहे. या पुढे झेडपीच्या निवडणुकीत वापरणार नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि बोटावर शाई पुसण्याचा प्रकार आणि दुबार मतदारावर भाष्य केले. “कोरस कंपनीचे मार्क वापरतोय. २०११ पासून मार्कर वापरले जात आहे. स्थानिक स्वराज संस्था निवडणूक ही १० वर्षांनंतर होत आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीत काय पद्धत आहे. अनेक ठिकाणी ४ वार्डमधून उमेदवार निवडून द्यायचे आहे. या मध्ये सुद्धा संभ्रम आहे. यासाठी आम्ही एक अॅनिमेशन व्हिडीओ तयार केला आहे. मतदारांना किती मत द्यायचं, कोणत्या मतप्रक्रियेचा कलर वेगळा आहे. काही मतदारांनी पाहिलं आहे त्यांचा गोंधळ उडाला आहे” अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी दिली.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
आज सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीत मार्कर पेनमुळे लावलेली शाई पुसली जाात आहे, असा मोठ्या प्रमाणात संभ्रम पसरवला जात आहे. माझं सांगने आहे ही एक इंटिबेल इंक आहे, भारत निवडणूक आयोग जी इंक वापरतो तीच इंक इंडरेबल इंक वापरत आहे, तीच इंक आहे, मात्र ती मार्कर पेनच्या स्वरुपात आहे. हे मार्कर पेन २०११ पासून वापरले जात आहे. यामध्ये ही शाई पुसली जात नाही, विशेष करून एकदा लावल्यानंतर १२ ते १५ सेकंदात शाई ड्राय होते. मतदार हा तोपर्यंत मतदान केंद्रातच असतो. या शाईविषयी कुठल्या प्रकारचा संशय आणि व्हिडीओ बाहेर काढले जात आहे. हा संभ्रम पसरवला जात आहे, असा दावाच वाघमारेंनी केला.
“मतदान मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान प्रतिनिधी असतात त्याची ओळख पटवून देतात. ती ओळख पटवल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार असतो. त्यांना मतदानाबद्दल काही आक्षेप असेल तर मतदान अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतो. एखदा मतदार जर पुन्हा मतदार करायला आला तर मतदान केंद्रावरील अधिकारी हे तपासतील जर आढळून आलं दुबार मतदार करण्यासाठी आला तर कारवाई केली जाईल” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी मतदारांचा टक्का चांगला आहे. मार्कर पेनचा अनुभव घेता, जिल्हा परिषद निवडणुकीला इंटेल इंक वापरणार आहोत. मतदानांचं प्रकार ३५ टक्के आहे. दोन टक्के ईव्हीएम खराब झाल्या आहेत .मागील १० वर्षांमध्ये एकही ईव्हीएम विकत घेतली नाही. त्याच त्या ईव्हीएम मशीन वापरत आहे. त्यामुळे २ टक्के ईव्हीएम खराब होण्याच प्रमाण आहे, असेही वाघमारे यांनी मान्य केले आहे.
निवडणूक आयोगाला सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे. सगळ्या गोष्टींना निवडणूक आयोग जबाबदार नाही, काही जबाबदारी ही मतदारांची पण आहे, काही जबाबदारी ही राजकीय पक्षांची पण आहे. काही जबाबदारी ही उमेदवारांची पण आहे, असं म्हणत वाघमारेंनी उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक आयोगावर कारवाई करण्याच्या विधानावर भाष्य केले आहे.
“याद्या चेक करत असतानाही अनेक मतदारांचं नाव यादीत नव्हतं. मतदाराची यादी विधानसभेची आम्ही वार्ड नुसार स्प्लिट करत असतो. पोलीस स्टेशनच्या हद्दीनुसार बदलत असतो. प्रभागानुसार बदलली आहे. त्यामुळे मतदान केंद्र राहणारच नाही. लोक विधानसभेची यादी घेऊन जात आहे. आमचं एॅप आहे, पोर्टल आहे. मतदान केंद्रावर मतदाराचे नाव तपासणासाठी BLO बसलेले आहे, त्यांच्याकडून मतदार शोधत येतो. यात मतदाराची जबाबदारी आहे’ असा दावाही वाघमारे यांनी केला.