पुणे : गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील सांबारे आणि युनिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय कोबारणे यांच्या नेतृत्वाखाली 11 जानेवारी 2026 रोजी १ तास ११ मिनिट ११ सेकंद लाठी–काठी फिरवण्याचा ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ हा विश्वविक्रम यशस्वीरित्या सादर करण्यात आला. या सादरीकरणातील उल्लेखनीय बाब म्हणजे 3 वर्ष ते १३ वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी होते.
या विश्वविक्रमात समर्थ पोलीस लाईन, सोमवार पेठ अंतर्गत पुढील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नावे पुढीलप्रमाणे…
आर्या औरंगे, शौर्य औरंगे, श्रिया सांबारे, राजवीर पंडित, सार्थक पंडित, मनश्री पंडित, सौम्य बेलसरे, माही बेलसरे, प्रभास पवार, दिव्यांका असवले, प्रियांशी मखरे, पियुष खवळे, रुद्र ओव्हाळ, अथर्व ओव्हाळ, गगन जोशी, श्रीराज कातोरे, जानवी तौर, अर्निका गायकवाड, श्री गायकवाड, प्रभंजन आळाने, रिधान पाटील, स्पृहा घोरपडे, साई शिंदे, पूर्वा शिंदे, माही थोरात, प्रीती शिंदे, गौरवी अधारी, शिवन्या धुमाळ, सानवी धुमाळ, सृष्टी डोलारे, कार्तिकीय साळुंखे ,परनिका कोळी, हिमांशू पेरणी, आण्वि काशीद, गार्गी काशीद, आयुष वसेकर, शर्वी थोरात, परी सिंग, शिवण्या पवार, जिनिषा शेंडकर, आरोही मलगुंडे, दूर्वा रासकर, प्रतीक्षा रासकर, साहिल रासकर, शरण्या अळकुरे, कीर्ती मोढवे, आर्या राऊत, शौर्य सांबारे,राजनंदिनी भिलारे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
विद्यार्थ्यांनी सलग 1 तास 11 मिनिटे आणि 11 सेकंद लाठी–काठी फिरवून हा विक्रम प्रस्थापित केला. विश्वविक्रम पुणे शहरात प्रथमच युनिक इंटरनॅशनल स्कूल, लोहगाव येथे पार पडला. या विक्रमाचे अधिकृत परीक्षण विवेक पांडे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. विक्रम पाटील (गॅस्ट्रोलॉजिस्ट), डॉ. पूजा पाटील-शेळके (रेडिओलॉजिस्ट) आणि पोलीस क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सागर घोरपडे, प्रमोद घाडगे (नँशनल व्हालीबाँल प्लेअर) यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. युनिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय कोबारणे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सांबारे आणि कोमल मॅडम यांनी केले. वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा विश्वविक्रम सोहळयाचे सादरीकरण यशस्वीरित्या पार पडले.