शिवसेना कोणाची? सिब्बलांचे एकापेक्षा एक बिनतोड युक्तिवाद तर नार्वेकरांनी आधीच सांगितला ‘निकाल’…

court
Share

मुंबई : शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाची? तसेच शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल युक्तिवाद करीत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आणि त्याला झालेला विलंब, हे ही सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू असताना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची बाजू अद्याप मांडली देखील नसताना राहुल नार्वेकर यांनी ‘पुढचा निकाल’ जाहीर केला.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली, या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहे. याचबरोबर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी दाखल केलेली आमदार अपात्रता संदर्भातील याचिकेवरही सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील आमदारांना दहाव्या अनुसूचीअंतर्गत अपात्र ठरवण्यास नकार दिल्याला या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती जे. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात कायद्याच्या सर्व तरतुदींचे मी पालन केले आहे. पीठासन अधिकारी म्हणून माझ्यावर ती जबाबदारी आहे. मी घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकून राहील, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे, १० व्या परिशिष्टाचे निकष पाळून मी आमदार अपात्रतेचा निकाल दिला आहे. मला संपूर्ण खात्री आहे की माझा निर्णय शाश्वत असल्याने सर्वोच्च न्यायालयात मी दिलेला निकाल कायम राहिल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे.

सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे निवडणूक आयोग तसेच विधानसभा अध्यक्षांवर तुटून पडले. त्यांच्या वक्तव्यांवर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, सध्या आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्य विषय असल्याने त्यावर अधिक बोलणं उचित नाही. पण मी चोखपणे काम केले असल्यामुळे माझ्या कामात कुठेही चूक निघणार नाही, अशी मला खात्री. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो, आपल्या सगळ्यांनीच सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी तो मान्य करायला हवा. सुनावणी सुरू असताना यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

शिवसेना कुणाची? कपिल सिब्बल यांनी कोर्टाला दिला थेट पुरावाच…

आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *