कंगना रनौत भडकली; प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा ‘कुत्रा’ असतोच…

kangana-ranaut
Share

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतन हिने दिल्लीतील आंदोलनावर मौन बाळगणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींना घेरणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली आहे. कंगनानं त्यांच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच, त्यांची भूमिका शेजारच्या राष्ट्राला मदत करणारी असते, असेही म्हटले आहे.

वरबॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी असं म्हटलं होतं की, बॉलिवूडमधील दिग्गज व्यक्ती सध्या कदाचित गप्प असतील, पण योग्य वेळ आल्यावर त्या नक्कीच आवाज उठवतील. या, कंगनानं थेट नसीरुद्दीन शाह यांची देशभक्ती आणि त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!

झारखंडमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नसीरुद्दीन शाह यांनी बाळगलेल्या मौनावर कंगनानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिनं सोशल मीडियावर पीयूष मिश्रा यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यामध्ये त्यांनी नसीरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर आपली मतं मांडली होती. शाह यांच्यावर कडक शब्दांत टीका करताना कंगनानं त्यांना चक्क ‘कोल्हा’ असंही संबोधले आहे.

कंगना रनौतनं लिहिलंय की, “खरं तर प्रत्येकजण कोणाचा ना कोणाचा ‘कुत्रा’ असतोच, पण मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, ज्या देशाचं अन्न मी खाते, त्याचचं मी रक्षण करते आणि त्यासाठीच लढते… याउलट, नसीर साहब याच देशाचे अन्न खातात, पण शेजारील राष्ट्रासाठी लढतात… आजच्या काळात ‘कुत्रा’ म्हटलं जाणं ही एक प्रकारची स्तुतीच आहे, कारण एखाद्यामध्ये गोडवा आणि निष्ठा हे दोन्ही गुण एकत्र आढळणं दुर्मिळ असतं… नसीरुद्दीन यांच्यासारखे ‘कोल्हा’ म्हणवून घेण्यापेक्षा ‘कुत्रा’ म्हणवून घेणं मला अधिक पसंत पडेल…”

दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांनी नवी दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाबाबत बॉलीवूड कलाकारांनी बाळगलेल्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हापासून या संपूर्ण वादाची ठिणगी पडली. ‘द वायर’ला दिलेल्या एका मुलाखतीत शाह यांनी चित्रपटसृष्टीतील बड्या व्यक्तींवर कडक शब्दांत टीका केली आणि त्यांची तुलना तोंडात हाड धरलेल्या कुत्र्याशी केली. नसरुद्दीन शाह म्हणाले की, “जेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी त्यांना परवानगी देईल, तेव्हाच ते बोलतील… एक जुनी म्हण आहे की, ज्या कुत्र्याच्या तोंडात हाड असतं, तो भुंकू शकत नाही. ज्या क्षणी ते हाड त्यांच्या तोंडातून खाली पडेल, किंवा त्यांचे दात मोडून टाकेल, त्याच क्षणी ते लगेच भुंकायला सुरुवात करतील…”

कंगना रनौतची जेन-झींबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह्य वक्तव्य…

Video: सुप्रिया सुळे, कंगना राणावत आणि खासदार महुआ नाचल्या तुफान…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *