Video: सुप्रिया सुळे, कंगना राणावत आणि खासदार महुआ नाचल्या तुफान…

supriya-sule-dance
Share

नवी दिल्ली: खासदार नवीन जिंदाल यांच्या लेकीच्या लग्नात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि भाजपच्या खासदार अभिनेत्री कंगना राणावत थिरकल्या. बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याच्या गाजलेल्या ओम शांती चित्रपटातील गाण्यावर महिला खासदारांनी ठेका धरला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नानिमित होणाऱ्या संगीत सोहळ्यासाठी सर्वपक्षीय महिला खासदारांनी नृत्याची रंगीत तालीम केली होती. भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकून यासंबंधीची माहिती दिली होती. शनिवारी रात्री महिला खासदारांनी सराव केल्याप्रमाणे ओम शांती ओम चित्रपटातील गीतावर नृत्याचे सादरीकरण केले.

भाजपच्या खासदार कंगना राणावत यांची पार्श्वभूमी चित्रपटांमधील भूमिकांची आहे. मात्र सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा यांना ओम शांती ओम गाण्यावरील ‘हुक स्टेप’ शिकण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. त्यासाठी त्यांनी एक दोन वेळा रंगीत तालीमही केली. खासदार नवीन जिंदाल यांच्या लेकीच्या लग्नसोहळ्यात महिला खासदारांच्या सादरीकरणाने अनेकांचे लक्ष वेधले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *