पुणे: महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा दबदबा होता. अशा ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा सूर दोन्ही बाजूच्या काही नेत्यांनी, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना आळवला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत लढल्यास काय होईल याविषयीचा लेखाजोखा आपण शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. त्यानंतर याविषयीचा निर्णय शरद पवार घेतील असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? हे सध्यातरी गुलदस्त्यातच आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वच राजकीय पक्षांची राजकीय खिचडी दिसली. राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची मनं जुळल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील अनेकांनी या निवडणुकीत दिलजमाईची भूमिका मांडली. पण या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी थेट राजीनामा देण्याची भूमिका मांडली. त्यानंतर आज ते शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काही निर्णय होईल का? की दोन्ही पक्ष त्यांच्या पातळीवर इतर पक्षांशी जुळवून घेतील याविषयी खल सुरू आहे.
गेल्या साडेचार वर्षांपासून एकत्र राष्ट्रवादी, नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष अशा प्रकारे आपल्याला दोन्ही पक्षात काम करण्याची संधी मिळाली. माजी महापौर या नात्याने मला शहरातील प्रश्न माहिती होते. कार्यकर्त्यांचं संघटनं मी केले. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. तर काहींनी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा सूर आवळला. महाविकास आघाडी तोडण्याचे काहींनी सूतोवाच केला. यामुळे महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.