ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. रुग्णालय प्रशासनाच्या चुकीच्या माहितीमुळे ही मुलगी थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या मार्गावर होती, असा खळबळजनक खुलासा भाजपा नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केला आहे.
प्रकृती बिघडल्याने शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीची डॉक्टरांनी पालकांची कोणतीही कायदेशीर संमती न घेता रात्रीच्या वेळी युरीन टेस्ट आणि सोनोग्राफी केली. रुग्णालयाने तब्बल तीन वेळा केलेल्या या चाचणीत मुलगी गर्भवती असल्याचा अहवाल दिला. धक्कादायक बाब म्हणजे, डॉक्टरांनी ही माहिती मुलीच्या पालकांना सांगण्याऐवजी थेट अल्पवयीन मुलीलाच सांगितली. त्यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेली ही मुलगी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचली होती, असा आरोप भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक भेट!
पालिकेच्या रुग्णालयातील या अहवालावर शंका आल्याने पालकांनी मुलीला तात्काळ एका खासगी रुग्णालयात नेऊन तपासणी केली. तेथे करण्यात आलेल्या चाचणीचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या रुग्णालयांतून परस्परविरोधी अहवाल आल्याने शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांची कार्यपद्धती आणि निदानाची अचूकता यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिपेश म्हात्रे म्हणाले, केडीएमसीच्या संबंधित डॉक्टरांवर महापालिकेने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल. दरम्यान, या गंभीर प्रकरणाचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण घटनेच्या सखोल चौकशीचे निर्देश दिले आहेत.