नवी दिल्ली: संसदेत शुक्रवारी केंद्र सरकारकडून महिला आरक्षणाशी संबंधित 131वे घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. मात्र, हे विधेयक केंद्र सरकारला मंजूर करुन घेता आले नाही. राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. अगदी भाजपच्या किरेन रिजिजू यांच्यासह अन्य खासदारही खळखळून हसले.
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी… राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला होता. गेल्या 12 वर्षांपासून लोकसभा आणि राज्यसभेत एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) शुक्रवारी धक्का बसला. महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील 131वी घटना दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारला संसदेत मंजूर करुन घेता आले नाही. हे विधेयक पारित होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज होती. मात्र, विधेयकायच्या बाजूने 298 आणि विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. त्यामुळे घटनादुरुस्तीसह महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. ही भाजपप्रणित रालोआ आघाडीसाठी नामुष्की मानली जात आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
महिला आरक्षण विधेयक आणि घटनादुरुस्तीवर शुक्रवारी लोकसभेत वादळी चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घटना दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातील आपली भूमिका मांडली. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, महिला या आपल्या राष्ट्राच्या संकल्पनेतील मुख्य भाग आहेत. आज सभागृहात बसलेल्यांपैकी सर्वजण त्यांच्या आयुष्यात महिलांकडून शिकले असतील, त्यांच्यावर महिलांचा प्रभाव असेल. आई, बहीण किंवा किरेन रिजिजू म्हणाले तसं, पत्नीकडूनही आपण अनेक गोष्टी शिकल्या असतील. पण पंतप्रधान आणि माझ्याबाबत पत्नीचा मुद्दा गैरलागू ठरतो. आम्हाला तिकडून यासंदर्भातील काही माहिती मिळत नाही, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. अगदी भाजपच्या किरेन रिजिजू यांच्यासह अन्य खासदारही खळखळून हसले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकार महिला आरक्षण विधेयकाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचनेचा कायदा कसा मंजूर करू पाहत, आहे याविषयी सविस्तर विवेचन केले. महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्याने एनडीए आघाडीला मोठा झटका बसला आहे. या मुद्द्यावरुन सत्ताधारी देशभरात रान पेटवण्याच्या तयारीत आहेत.
राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा, सत्ताधारी विरोधक भिडले…