मुंबईः पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या वाहन धारकांना आता पुन्हा एकदा महागाईचा आणखी एक मोठा झटका सहन करावा लागणार आहे. मुंबई आणि महानगरामध्ये सीएनजीच्या (CNG) दरात पुन्हा 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. CNGचा दर प्रतिकिलो 86 रुपयांवर तर पीएनजीमध्येही (PNG) 50 पैशांची वाढ करण्यात आली असून हे दर आता प्रति युनिट 52 रुपयांवर पोहचले आहे. या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनचालकांचे बजेट कोलमडणार आहेत. सोबतच वाहतूक खर्च वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही मोठी कात्री लागणार आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ आजपासूनच (30 मे) लागू होणार आहे. आजपासून (शनिवार) संपूर्ण मुंबई आणि महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) महाग होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) किरकोळ दरात 2 रुपये प्रति किलोने वाढ केली आहे, तर पाईपद्वारे मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही 50 पैसे प्रति युनिटने वाढ होणार आहे. या नवीन बदलामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील इतर भागांमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवरून 86 रुपये प्रति किलो होणार आहे.
एमजीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 13 मे रोजी झालेल्या 2 रुपयांच्या दरवाढीनंतर या महिन्यात सीएनजीच्या दरात ही दुसरी दरवाढ आहे. एप्रिलमध्येही सीएनजीच्या दरात ₹1 ने वाढ करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले, “जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम करणारे भू-राजकीय मुद्दे, महागड्या गॅस स्रोतांवरील वाढते अवलंबित्व, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे एमएमआरमध्ये सीएनजीच्या दरात दोन रुपयांची आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरात 50 पैशांची वाढ झाली आहे. किमतीत बदल होऊनही, सीएनजी इतर इंधनांच्या तुलनेत लक्षणीय बचत देत आहे. मुंबईतील सध्याच्या इंधनाच्या किमतींनुसार, सुधारित दरातील सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत अंदाजे 45% आणि डिझेलच्या तुलनेत 12% बचत देतो.”
महागाईचा झटका! CNG च्या दरात मोठी वाढ, पाहा नवे दर…
महागाईचा भडका! देशात पेट्रोल-डिझेलचे दर 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले; पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! दहा दिवसांत तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर…
पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’ नंतर सातबारा दाखवा आणि डिझेल घ्या….
पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, पाहा नवीन दर…
महागाईचा भडका! देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; पाहा नवीन दर…
राहुल गांधी यांची पोस्ट! पहिला वार गॅसवर आता नंबर पेट्रोल, डिझेलचा…
पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; ही नौटंकी आहे : राहुल गांधी