पुणे: शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून, त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह गावठी दारुच्या दुकानावर जाऊन तिथे मनसे स्टाइलने तोडफोड केली आहे. हडपसरमधील दारू अड्ड्याची तोडफोड केली आहे. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण होते.
पुणे शहरातील हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत भीषण आणि गृह विभागाच्या बेलगाम आणि भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेत मृत्यू झाल्याबाबतच्या कारणांचा काही अहवाल आहे का, याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेचं कारण सांगून हा अहवाल दाखवता येत नसल्याचे थातूरमातूर कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!
हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अनेकजण अजूनही मृत्यूशी झुंजत आहेत. राज्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवूनही सरकार त्याला आळा घालू शकलं नाही आणि यामुळंच अवैध दारू पिऊन 18 जणांचा बळी गेला, याची पूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पाशवी बहुमतामुळं हे सरकार केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेत आहे. पण, नैतिकदृष्ट्या या सरकारने कधीच जनतेचा विश्वास गमावलाय. त्यामुळं आपल्या जबाबदारीचं थोडं जरी भान या सरकारला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरात 15 जणांचा विषारी दारूमुळं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, बंदी असलेली हातभट्टीची गावठी दारू प्यायल्यानं 15 जणांचा मृत्यू झाला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे नावाच्या व्यक्तीला अटक केली. मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला असून त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करून पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ताब्यात दिले आहे.
विषारी दारू बनवणारा वानखेडे हा पुण्यातल्या मुंढवा परिसरात होता राहायला होता. पुण्यातील उरुळी कांचन आणि पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी इथे हा वानखेडे बनवायचा बनावट दारू तयार करायचा. बनावट दारू बनवून पुण्यातील हडपसर, काळेपड आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात हा बनावट दारू विकायचा. हीच बनावट दारू पिऊन पुण्यात 15 जणाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी बनावट दारूचे कॅन केले जप्त केले होते.
मोठा गौप्यस्फोट! रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील…
रोहित पवार यांचे भुवया उंचावणारं वक्तव्य; पक्की माहिती शिकार होणार…
चर्चेचा विषय! रोहित पवार यांचे काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले…
रोहित पवार यांचा गौप्यस्फोट, अजित दादांच्या घराबाहेर अनेक नेत्यांची करंगळी कापली…