सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राजकीय नाट्यात मोठा ट्विस्ट…

ajit-pawar-sunetra-pawar
Share

मुंबई : राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या जागेवरील पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादीत चांगलीच रस्सीखेच सुरू असून, राष्ट्रवादीने सुचवलेल्या दोन नावांवर भाजपने नकार दिला आहे. त्यामुळे या एका जागेसाठी लॉबिंग सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सुनेत्रा पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपमध्ये प्रचंड पडद्यामागे घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. राष्ट्रवादीने सुरुवातीला या जागेसाठी अविनाश आदिक आणि सुबोध मोहिते यांच्या नावांची शिफारस केली होती. मात्र, भाजपने या दोन्ही नावांवर थेट नापसंती दर्शवल्यामुळे महायुतीत पेच निर्माण झाला आहे. परिणामी, भुजबळ स्वतः या रेसमध्ये आघाडीवर आले आहेत.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

अजित पवार यांच्या आठवणींवर ‘महाराष्ट्राचे दादा’ पुस्तक तयार!

छगन भुजबळ जर दिल्लीच्या वाटेवर गेले, तर राज्यातील त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद रिक्त होईल. या एका जागेवरून आता राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. राज्यसभेवर गेल्यानंतर भुजबळांच्या जागी रिक्त होणाऱ्या कॅबिनेट मंत्रीपदासाठी धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे, छगन भुजबळ हे आपले मंत्रीपद कुटुंबातच ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून, आपले पुतणे समीर भुजबळ यांना हे मंत्रीपद मिळावे यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

या संपूर्ण राजकीय नाट्यात आणखी एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असून, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यसभेच्या एका जागेमुळे संपूर्ण राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा दिला राजीनामा; नियम काय सांगतो पाहा…

राष्ट्रवादीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर, तीन नेत्यांचा पत्ता कट…

अजित पवार यांच्या मृत्यूशी कनेक्शन सांगणारे अशोक खरात याचे अनेक कॉल रेकॉर्ड…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *